Friday, October 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“मॅडम तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून सोलापूर जिल्ह्यात या” जिल्हा परिषदेच्या अभियंता पुरस्कारात सीईओ आव्हाळे यांच्या चेहऱ्यावरील हावभाव असे आले समोर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 September 2023
in solapur
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हा परिषदेच्या अभियंता पुरस्कार वितरण कार्यक्रमात सूत्रसंचालकाने सीईओ मनीषा आव्हाळे यांना “मॅडम तुम्ही सोलापुरात सहाय्यक जिल्हाधिकारी झालात आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झालात पुन्हा यापुढे तुम्ही सोलापूरच्या जिल्हाधिकारी म्हणून यावे” अशी अपेक्षा व्यक्त करतात सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. हे ऐकून चेहऱ्यावर हसत हसतच त्या भाषण करायला उठल्या, आव्हाळे यांनी महाराष्ट्र फार मोठा आहे मला महाराष्ट्रात सेवा करायची आहे असे सांगून विषयाला पूर्णविराम दिला, नंतर त्या म्हणाल्या, माझे बाबा मला इंजिनियर हो म्हणायचे. त्यानंतर आयएएस हो असा सल्ला दिला होता मी विधी विभागा पदव्युत्तर शिक्षण घेतले. नंतर आयएएस झाले. 

सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात देखील किल्ले बांधून घेतले. आजही किल्ले अभेद्य आहेत. अभियंत्यांनी कामाला कल्पकतेची जोड द्यावी.जेणे करून काम पाहून नाव घेतले पाहिजे असे काम करा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले. 

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज अभियंता दिना निमित्त सर विश्वेश्वरय्या यांची जयंती व उत्कृष्ठ अभियंता पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करणेत आले होते. 

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी  जिल्हा परिषदेच्या सिईओ मनिषा आव्हाळे या होत्या. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी दिनकर महिंद्रकर प्रमुख उपस्थित होते. या प्रसंगी २६ अभियंतां यांचा सपत्नीक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करणेत आला. तसेच गुणवंत पाल्यांचा सत्कार सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते करणेत आला. 

छोट्यातले छोटे काम करा पण चांगले काम करा असे सांगून सिईओ मनिषा आव्हाळे म्हणाले, स्वतच्या कल्पकतेची जोड द्या. आजचे युगात जे तंत्रज्ञान आहे त्यांची जोड द्या. त्याला गुणवत्ता नक्की येईल. पुढच्या २० वर्षे या कामांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. शाळा असे प्राथमिक केंद्र, जलजीवन मिशन, आदी कामे गुणवत्तेची करा असे आवाहन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केले. 

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर म्हणाले, जलजीवन मिशन, बांधकामे १ व २ तसेच जनसुविधा व इतर कामे अभियंत्यांनी केली आहेत. ४० टक्के पेक्षा अधिक  कामे पुर्णत्वाकडे आहे. कधी तरी काम करीत असताना शाबासकीची थाप पाठीवर मिळाली कि काम करणेस प्रेरणा मिळते. असेही अतिरिक्त सिईओ कोहिणकर यांनी सांगितले.

कामात जीव ओतला तर काम करणेस आनंद मिळतो. अभियंत्याचे देशाच्या उभारणीत मोठे योगदान आहे. असे मत कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी बोलताना व्यक्त केले. 

या कार्यक्रमास माजी कार्यकारी अभियंता पंडित भोसले, उप अभियंता सुनील कटकधोंड, उप अभियंता सुरेश कमळे, कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज, लिपिकवर्गीय कर्मचारी संघचनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, प्रमुख उपस्थित होते. शाखा अभियंता सोनाली कदम, रविशंकर बोधले, आयुब शेख, सिध्दाराम बोरूटे, सचिन पवार, सुंदर हस्ताक्षर असलेले अभिमन्यु कांबळे, शाखा अभियंता मुजावर, मेघराज कोरे, अभियंता चेतन वाघमारे, माजी उप अभियंता रमेश चौगुले , चेतन भोसले यांनी कार्यक्रम यशस्वी करणे साठी परिश्रम घेतले. प्रास्तविक कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांनी केले सुत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केले.तर आभार रवीशंकर बोधले यांनी आभार मानले.

SendShareTweetSend
Previous Post

डिजिटल युगात ग्रंथालय चळवळ पुढे नेण्यासाठी तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याची गरज..! प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी

Next Post

भाजपा सोलापूर ग्रामीण पूर्वची जिल्हा कार्यकारिणी जाहीर ; तब्बल 120 जणांची जंबो कार्यकारिणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

भाजपा सोलापूर ग्रामीण पूर्वची जिल्हा कार्यकारिणी जाहीर ; तब्बल 120 जणांची जंबो कार्यकारिणी

ताज्या बातम्या

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001428
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group