सोलापूर : राज्याचे नगरविकास मंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल 40 हून अधिक आमदार फोडले असल्याने हे सरकार कधीही पडू शकते अशी स्थिती सध्या राज्यामध्ये निर्माण झाली आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर आपले मंत्रीपद हटवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीही राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात असून एकनाथ शिंदे आपल्या सोबत असलेल्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालाला देणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर महेश कोठे यांच्याशी या प्रकरणी चर्चा केली असता, त्यांनी सोलापूर महानगरपालिकेमध्ये मी अशा राजकीय परिस्थितीतून गेलेलो आहे, याचा मला चांगला अनुभव आहे. जर सरकार बरखास्त झाले तरच सरकार पडेल अन्यथा सरकारला कोणतीही अडचण राहणार नाही. नियमानुसार आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार राहणार आहे. शंभर टक्के शिवसेना भारतीय जनता पार्टी सोबत गेली तरच भाजपला सरकार स्थापन करता येणार आहे अशी माहिती महेश कोठे यांनी दिली. दरम्यान कोठे काय म्हणाले पहा हा व्हिडिओ….


















