सोलापूर : सोलापूर शहरातील जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह(मुलांचे) व सावित्रीबाई फुले मुलीचें वसतीगृह कोविडमुळे मार्च 2020 पासुन विद्यार्थी/ विद्यार्थीनी करीता बंद आहे. हे वसतीगृह सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले. शासनाने कोविड 19 चे सगळे निर्बंध हटविले आहे. सोलापूर शहरातील सर्व महाविद्यालये पुर्ण क्षमतेने सुरू आहे.
या दोन्ही वसतिगृहात सुमारे 900 विद्यार्थी/ विद्यार्थीनी राहण्याची उत्तम सोय असून, संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातुन विद्यार्थी/विद्यार्थीनी शिकण्यासाठी येत असतात. तरी सोलापूर शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खाजगी रुम भाड्याने घेऊन राहु शकत नाहीत. यामुळे आज रोजी जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह व सावित्रीबाई फुले मुलीचें वसतीगृह बंद असल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. जून पासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात झालेली असून, तात्काळ वसतिगृह सुरू करण्याची कार्यवाही करावी अशी मागणी कांचन फाउंडेशनचे पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी अक्कलकोट युवक काँग्रेस उपाध्यक्ष ॲड पैगंबर सय्यद, द.सो काँग्रेसचे उपाध्यक्ष मौलाली शेख, डॉ विश्वनाथ हडपद, साजिद मकानदार, ॲड सलामत पटेल, सोहेल शेख, संदिप माने हे उपस्थित होते.


















