सोलापूर : माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी गौप्यस्फोट केला असून कळंब – उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी महाराष्ट्राची दिशाभूल केली असल्याचे सांगितले आहे. कैलास पाटील यांची सुरत मधून मुंबईकडे परतीच्या प्रवासाची आम्ही व्यवस्था करून दिली मात्र त्यांनी प्रचंड पाऊस पडत असताना 4 किलोमीटर चालत गेले असल्याचा केलेला दावा साफ खोटा आहे.
आमदार कैलास पाटील खोटं आणि आभासी कथानक रचून मातोश्रीची आमदार सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करताहेत हे दुर्दैवी असून डबलढोलकी असणारे आमदार पाटील यांच्यापासून पक्ष प्रमुख यांनी देखील सावध राहावं असे आवाहन सावंत यांनी केले…

















