सोलापूर : 26 जून हा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिवस राज्यात सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समता रॅली काढण्यात आली. रविवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले.
दरम्यान सीईओ स्वामी यांनी समस्त सोलापूरकरांना शाहू महाराज जयंतीच्या शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याचा गौरव केला, महाराजांचे अनंत उपकार महाराष्ट्रावर असल्याचे प्रतिपादन केले….
डॉ आंबेडकर चौकापासून सुरू झालेली ही समता रॅली डफरीन चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक मार्गे सात रस्ता सामाजिक न्याय भवन जवळ विसर्जित झाली…
या रॅलीत विशेषाधिकारी सुलोचना सोनवणे, बार्टीच्या प्रकल्प अधिकारी प्रणिता सोनकांबळे, तालुका समन्वयक उमेश पुजारी, समता दूत राजश्री कांबळे, अश्विनी मोरे, सुभाष गायकवाड यांच्यासह इतर कर्मचारी विविध प्रशालेचे विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

















