सोलापूर – विद्यार्थींची गुणवत्ता सुधारण्यासाठी दशसुत्री कार्यक्रम देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांचे बैठकीचे आयोजन करणेत आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी होते. या प्रसंगी उप शिक्षणाधिकारी संजय जावीर, डाएटचे प्राचार्य रामचंद्र कोरडे, अधिव्याख्याता इमानदार हे प्रमुख उपस्थित होते.
सन २०२२-२३ शैक्षणिक कामाचे नियोजन करणेसाठी व्हीजन २२ ची प्रभावी अंमलबजावणी करा असे सांगून सिईओ दिलीप स्वामी यांनी पालक शिक्षकांचे जबाबदारीवर विद्यार्थ्यांनी शाळेत पाठवितात. विद्यार्थ्याना स्पर्धाक्षम बनविणेसाठी सक्षम करा. आरोग्य वर्धक व संस्कार क्षम शिक्षण द्या असे भावनिक आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.
कोरोनाचे काळात शिक्षकांनी घरी बसून देखील आॅनलाईन शिक्षण, पारावरची शाळा, स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रमासाठी दिलेले योगदान मी विसरू शकणार नाही. कोरोना काळात विद्यार्थी शिक्षकांपासून दूर गेले. परिणामी त्यांचे गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. कोरोना काळात झालेली हानी आपणास भरून काढायची आहे.
दशसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी करा. मुख्याधापक व शिक्षकांच्या बैठका घ्या असे आवाहन सिईओ स्वामी यांनी केले.
शिकवताना मोबाईल बंद ठेवा
शाळेत जर शिकविताना मोबाईल ची गरज नसेल तर मोबाईल बंद ठेवा. मोबाईल चे दुष्परिणाम विद्यार्थीवर होणार नाहीत याची काळजी घ्या. मोबाईल मध्ये विद्यार्थी आसक्त होणार नाहीत याची काळजी घ्या. यामुळे गंभीर आजार देखील उद्भवू शकतात याची जाणीव पालकांना करून द्या. कोरोना काळात पर्याय नव्हता. आता तरी काळजी घेता असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.
रिड टू मी मध्ये तीन तालुक्यांची गौरव
करमाळा, बार्शी व अक्कलकोट हे तीन तालुके रिड टू मी मध्ये टाॅप ला आहेत. या तीन तालुक्यांचा गौरव सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आला.
….अन्यथा डाएट वरच कारवाई ..!
डाएट चे व्हिजन 2022-23 मध्ये डाएट चे योगदान महत्वाचे आहे. या मध्ये कुचराई केलेस मला डाएट कडे पहावे लागेल. गुणवत्ता, प्रशिक्षण, संवाद, समन्वय या बाबतीत डाएट ने दक्ष रहावे. याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
शिक्षण विभागा साठी दशसुत्री
………………………
✔️गुणवत्ता पुर्ण शिक्षण प्रदान करणे
✔️स्पर्धाक्षम विद्यार्थी तयार करणे
✔️ आनंद दायी व नाविण्यपुर्ण शिक्षण
✔️ आरोग्य वर्धक व संस्कारक्षम शिक्षण
✔️ तंत्रस्नेही/ आयटीक्षम शिक्षण
✔️सुप्त गुण शोधून त्यास प्रोत्साहन
✔️ स्व अभिव्यक्ती प्रोत्साहन/ लेखक/ कवी निर्मिती
✔️ कौशल्य चिकित्सक विचार
✔️सृजन शिलता सहयोग, ज्ञानातील आधुनिकता गृहन
करणेसाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे
✔️ स्वावलंबन प्रवृतीला चालना व देशभक्ती
✔️ मातृपितृ भक्ती वाढविणे
✔️ गुरुकुल पध्दतीला उजाळा देत शंभर टक्के विद्यार्थी उपस्थिती


















