सोलापूर : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून,मोदी -शहा जोडीने महाराष्ट्राला भविष्यात पंतप्रधान पद मिळू नये याची तजवीज केली असावी.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,त्यांच्या हुशारीच्या व मुत्सद्दीपणाच्या जोरावर भविष्यात पंतप्रधान पदाचे दावेदार होण्याची दाट शक्यता होती.त्यांना वेळीच रोखण्यासाठी मोदी – शहांनी जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटले असावेत.
विरोधी पक्षाचा का असेना परंतु मराठी माणूस देशाचा पंतप्रधान व्हावा असे एक महाराष्ट्रीयन म्हणून आम्हाला वाटते.स्व.यशवंतराव चव्हाण,शरद पवार, नितीन गडकरी यांच्या नंतर देशाचे नेतृत्व करण्याची गुणवत्ता व क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्यात नक्कीच आहे.परंतु महाराष्ट्रातील सक्षम लोकनेत्यांचा आकस राष्ट्रीय स्तरावर सर्वपक्षीय आहे.भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांनी आत्तापासूनच ती काळजी घेतल्याचे दिसत आहे.

















