सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पेतून यंदाची आषाढी वारी ही हरित वारी करण्याचा उपक्रम राबविला जात आहे.
याच सोबत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने स्वछतेचे अप टू डेट नियोजन केले असून वारीतील महिला वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली आहे.
पालखी मार्गावर विसावा आणि मुक्काम ठिकाणी फिरती शौचालये सोय तर करण्यात आलीच त्याच बरोबर प्लास्टिक मुक्त वारी व्हावी म्हणून ठिकठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत.
स्तनदा मातांसाठी माता-बालक कक्ष 67 ठिकाणी स्थापन करण्यात आले आहेत. पालखीचा विसावा आणि मुक्काम ज्या ठिकाणी आहेत अशा बावीस गावांमध्ये महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
माळशिरस तालुक्यातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज या पालखी मार्गावरील वारकरी महिलांसाठी खाजगी शौचालय सुविधा उपलब्ध करण्यात आली असून ज्याठिकाणी घरातील खाजगी शौचालय आहे तिथे गुलाबी झेंडे लावण्यात आले आहेत.
कारूडे, धर्मपूरी, मांडवे, पीलीव, पुरूदांवडे, खुडूस, विझोरी, वेळापूर, तांबवे, माळीनगर, लवंग, बोरगांव, माळखांबी, तोंडले, बोडले, दसूर या सर्व गावांमध्ये शौचालय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी सर्व ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली, विविध सूचना दिल्या. दरम्यान या एकूणच नियोजनाची माहिती शेळकंदे यांनी दिली….























