महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत होते. त्यांनी राष्ट्रपती कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी ,गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटी घेतल्या. उभयतांना विठ्ठल रुक्माईची मूर्ती भेट देऊन महाराष्ट्राच्या विविध विषयांवर चर्चा केली.
महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासहित स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक व्हावी ही सरकारची भूमिका आहे. तसेच पावसाळ्यात निवडणूक घेण्यात अडचणी येतात, यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विचार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं.



















