सोलापूर : कोरोना महामारीच्या दोन वर्ष गॅपनंतर यंदाची आषाढी एकादशी वारी साजरी केली जात आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता.
जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी तसेच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे स्वागत त्यानंतर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले.
वारीमुळे प्रशासन ही उत्साहात होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुंदर माझे कार्यालय अभियान अंतर्गत पुरस्कार व. जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छता दिंडी समारोप कार्यक्रम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार होते.
वारी दोन दिवसावर येताच सीईओ दिलीप स्वामी यांची तब्येत बिघडली. डॉक्टरानी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला. आषाढी एकादशी महापूजा व स्वच्छता दिंडी समारोप कार्यक्रमाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वामी यांना हजर राहता आले नाही.
दिलीप स्वामी यांनी मागील दिड वर्षात सोलापूर जिल्हा परिषदेत राबविलेले अभियान व उपक्रमांची पुस्तिका तयार करण्यात आली होती. त्याचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. हा सोहळा स्वामी हे सोलापुरात घरात बसून व्हिडिओ कॉल वर पहात होते. यावरून या प्रशासकीय अधिकाऱ्याची घालमेल दिसून आली.


















