सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून अधिकाऱ्यांचा रस्ता अडवला होता. रविवारी हरणा नदीमध्ये मुस्ती येथील एक ग्रामस्थ पाण्यात वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झाला त्या निषेधार्थ नदीवर पूल बांधण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करत या सर्व आंदोलकांना उठवून प्रशासनाला निवेदन देण्यास भाग पाडले.
दक्षिण पंचायत समितीचे माजी सभापती तथा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस भीमाशंकर जमादार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले मुस्ती या गावापासून 100 मीटर अंतरावर हरणा नदी आहे. मुस्ती वरून अरळीकडे जाण्यासाठी मार्ग नाही, नदीतून जावे लागते.
नदीवर ब्रिज नसल्याने नदीत बुडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान रविवारी शौकत नदाफ हे नदीत अचानक पाणी आल्याने वाहून गेले, सोमवारी त्यांचा मृतदेह सापडला. केवळ नदीवर ब्रिज नसल्याने नदाफ यांचा मृत्यू झाल्याने मुस्ती गावचे नागरिक संतापले. मंगळवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी ठिय्या मांडला अधिकाऱ्यांचे रस्ता अडवला आणि घोषणाबाजी केली..
दरम्यान भीमाशंकर जमादार यांनी एकूणच परिस्थिती सांगताना मयत झालेल्या शौकत नदाफ यांच्या कुटुंबियांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी तसेच तातडीने नदीवरील ब्रिज बांधण्याची परवानगी द्यावी अन्यथा आम्ही इथून हलणार नाही असा इशारा दिला…
आंदोलनाची माहिती मिळतात सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आंदोलकांना इथून उठवले आणि जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.



















