Tuesday, September 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 March 2026
in health
0
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर
0
SHARES
53
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूर : प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयासाठी नवीन एम. आर. आय. मशीन उपलब्ध होणार आहे.
मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन एम. आर. आय. मशीन मिळण्यासाठीच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीपत्रावर सही करत याबाबतचे निर्देश राज्य शासनाला दिले.

सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात सध्या असलेली एम.आर.आय. मशीन १२ वर्षे जुनी असून ती कालबाह्य झालेली आहे. या मशीनच्या विक्री बाबतची निविदाही डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने काढली आहे. सोलापूर शहर जिल्ह्यासह परिसरातील जिल्हे तसेच कर्नाटक, तेलंगणातूनही रुग्ण सोलापुरात उपचारासाठी येतात. सोलापुरात उपचारासाठी आल्यानंतर खासगी रुग्णालयातून या रुग्णांना एम. आर. आय. करण्यासाठी खासगी ठिकाणी जावे लागत आहे. बहुतांश रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे त्यांना नाईलाजाने आर्थिक अडचणींना सामोरे जात अधिक रक्कम देऊन एम. आर. आय. स्कॅन करून घ्यावे लागत आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात नव्या तंत्रज्ञानासह एम. आर. आय. (टेस्ला -३) ही यंत्रणा तातडीने उपलब्ध झाल्यास गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळणार असून सोलापुरातील आरोग्य सुविधाही सुधारणार आहे. त्यामुळे नवी एम. आर. आय. मशीन तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी ११ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीपत्रावर शेरा मारून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नवी एम.आर.आय. मशीन देण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नवीन एम.आर.आय. मशीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
———-

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही झाली होती सकारात्मक चर्चा

काही महिन्यांपूर्वी पुणे येथे झालेल्या विभागीय बैठकीत सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात नवीन एम.आर.आय. मशीन बसवण्याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही मागणी केली होती. यावेळी नवीन एम. आर. आय. मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती, असे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.
————-

सोलापूर हे कामगारांचे शहर आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचारांदरम्यान आवश्यक एम.आर.आय. स्कॅनिंग करणे गोरगरीब रुग्णांना परवडत नाही. शासनाच्या एम. आर. आय. मशीनच्या अभावामुळे गोरगरीब रुग्णांना आर्थिक त्रास सहन करावा लागू नये याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवीन एम. आर. आय. मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नवीन एम. आर. आय. मशीन उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोलापूरचा सर्वांगीण विकास होत असताना वैद्यकीय सुविधांचाही अभाव राहू नये याकरिता मी, पालकमंत्री जयकुमार गोरे आग्रही आहेत. नवीन एम. आर. आय. मशीन देण्याचा सूचना देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ही मशीन मिळवण्याकरिता प्रयत्न केलेल्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Tags: @Devendra kotheCivil hospital solapur
SendShareTweetSend
Previous Post

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

Next Post

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001147
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group