सोलापूर : जिल्हा परिषदेत शुक्रवारी दुपारी साडेतीन पासून काही महिला मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कार्यालया बाहेर सुमारे अडीच तास थांबून होत्या.
साहेब व्हिडीओ कॉन्फरन्स असल्याने कामात होते. महत्वाचा व्हीसी असल्याने त्या महिलांना शेवटी सीईओ साहेबांची भेट झाली नाही. शेवटी त्यांना इनवर्ड मध्ये आपली तक्रार द्यावी लागली.
त्या महिला होत्या बार्शी तालुक्यातील उमेद अभियानात काम करणाऱ्या. उंडेगाव आदर्श ग्रामसंघाच्या. त्यांना मागील काही दिवसांपासून उमेद अभियानाचे बार्शी तालुका व्यवस्थापक गणेश पाटील यांच्याकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी त्या महिलांनी मांडल्या. काय म्हणाल्या त्या महिला पहा हे व्हिडीओ…


















