सोलापूर : मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी तीन महिन्याच्या गॅप नंतर प्रशासनाची समन्वय सभा घेतली या सभेला मुख्यालयातील सर्व प्रमुख अधिकारी तसेच सर्व व्हिडिओ विस्तार अधिकारी यांची उपस्थिती होती शिक्षण विभाग, महिला बालकल्याण, पाणी व स्वच्छता विभाग, घरकुल योजना याबाबत सीईओ गंभीर दिसून आले.
प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषदेचे कर्मचारी काम करतात या सर्व विभागाच्या योजना कल्याणकारी असून त्या योजनेतून ग्रामीण भागाचा विकास होतो. या योजना लाभार्थ्यांपर्यंत जातात का? अधिकाऱ्यांनी फिल्डवर जाऊन पाहिलंय का? असे अनेक प्रश्न करत जो कर्मचारी चांगले काम करेल त्याचा सत्कार होईल आणि कामचुकार असेल त्याला तांदळातील खड्यासारखे बाहेर काढेन असा थेट इशारा दिला…



















