सोलापूर : एकरुख मध्यम प्रकल्प पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे जलाशय साठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. आज दिनाक ०९/०८/२०१२ सकाळीच जलाशयाच्या १०४ जलसाठा आहे. सध्याचे पाणलोट क्षेत्रातील येण्याचा विसर्ग पाहता येत्या २४ तासात जलाशयात पूर्ण संचय पातळी पर्यंत पाणी साचेल असे अनुमान आहे असे कार्यकारी अभियंता सोलापुर पाटवांधारे विभाग सोलापूर यांचे द्वारे सुचीत करण्यात आले आहे.
तरी सदर जलाशयाचे सांडव्यातून पाणी ओसंडून ज्या ओढ्यातून प्रभावीत होते, तो ओढा सोलापूर शहरातील पांढरेवस्ती, अवंतीनगरी, मडकीवस्ती वसंत विहार, बाळे, देगांव, कवठे, डोणगांव, बेलाटी अशा मार्गे जात असल्याने सदर परिसरातील संभाव्य हानी टाळणेसाठी दक्षता घेणे आवश्यक आहे.
इकडील विभागीय कार्यालय क्र. ०६ तर्फे या ओढ्याच्या परिसरातील प्रभावीत होणा-या क्षेत्रातील सर्व नागरिकांना सतर्क व सावधान राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तरी सदर जलाशयाचे सांडव्यातून पाणी ओसंडून ज्या ओढ्यातुन प्रभावीत होते त्या क्षेत्रातील सर्व रहीवाशी यांनी आपली जिवीत वित्त व इतर कोणतीही हानी अथवा नुकसान होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.




















