सोलापूर-वाराणसील येथील श्री काशीविश्वनाथाच्या धरतीवर आता सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मीणी मंदीर परिसराचा विकास केला जाणार आहे.त्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखालील दहा अधिकार्यांचे शिष्ट मंडळ मंगळवारी उत्तर प्रदेशातील वाराणसीसाठी रवाना झाले आहे. दोन दिवस असणार्या या अभ्यास दौर्यात काशीविश्नाथ मंदीरातील सर्व गोष्टींचा अभ्यास करुन त्या सुधारणा पंढरपूर येथील विठ्ठल मंदीरात करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले आहे.
अनाधी कालापासून अस्त्विात असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मीणीचे मंदीर जगत विख्यात आहे.तसेच या मंदीराला नैसर्गिक आणि ऐतिहासिक देणगी लाभलेली आहे.मात्र या मंदीर परिसराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही.त्यामुळे उत्तर प्रदेशात असलेल्या वाराणसी येथील श्री काशिविश्वनाथ मंदीराचा संपूर्ण विकास उत्तर प्रदेश सरकार आणि त्या मंदीर समितीने केलेला आहे.त्यामुळे काशिविश्नाथ मंदीर जगाच्या नकाशावर आले आहे.त्या ठिकाणी भाविकांसाठी असणार्या सेवा सुविधा, मंदीराची रचना, दर्शन रांगा, नदीचे पावित्र्य, घाट, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने असलेल्या सेवा सुविधा, होणार्या गर्दीवर करण्यात येणार नियंत्रण, स्वच्छता, स्वच्छतेच्या सेवा सुविधा अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखालील जवळपास दहा अधिकार्यांचे शिष्टमंडळ मंगळवारी वाराणसी दौर्यावर गेले आहे.
यामध्ये ग्रामीण पोलिस अधीक्षका, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, पंढरपूर मंदीर समितीचे सदस्य, पंढरपूरचे तहसीलदार आणि प्रातांधिकारी यांच्यासह काही प्रमुख अधिकार्यांचा यामध्ये समावेश आहे. दोन दिवस चालणार्या या अभ्यास दौर्यात वाराणसीचे जिल्हाधिकारी, तसेच काशीविश्नाथ मंदीर समितीचे सदस्य, प्रशासक तसेच वाराणसी महापालिकेचे आयुक्त या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी झालेल्या विकास कामांची तसेच विविध प्रकल्प आणि संकल्पनाची माहिती देणार आहेत.त्याचा फायदा आता सोलापूर जिल्ह्याला होणार असून पंढरपूर येथील प्राचीन मंदीराचा विकास ही आता वाराणसीच्या धर्तीवर होणार आहे.त्यामुळे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मीणी मंदीर परिसर ही आता जगाच्या नकाशावर येणार आहे.



















