सोलापूर – ( प्रतिनिधी ) – सोलापूर शहरातील राजरोसपणे चालणाऱ्या मटका, जुगार दारू,गुटखा व इतर अवैध धंद्याच्या विरोधात संघर्ष सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अयाज शेख यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अवैध धंदे बंद करा यासाठी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
शहरात खुले आम मटका, जुगार व सर्व प्रकारचे अवैध धंदे राजरोसपणे खुलेआम सुरू आहे सोलापूर शहरात सातही पोलिस ठाण्याच्या हद्दीत, न्यायालय समोर , कॉलेज समोर , चौका-चौकात सुरू असताना पोलीस प्रशासन झोपा काढत आहे काय ? असा संतापजनक सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करावेत संबंधितावर कडक कारवाई व्हावी, यासाठी जिल्हा परिषद पूनम गटे समोर ‘बेधडक धरणे आंदोलन’ मोर्चा काढण्यात आला.आम्हाला रक्षक हवा आहे,भक्षक नको, काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे शहरात अवैध धंदे वाढत असून त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढत आहे.त्यामुळे यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. हे अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालतात याचे उत्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द्यावे.!
अवैध धंदे तरुण पिढीला बिघडवण्याचे काम करत आहेत.सकाळी उठून व्यायाम करण्याऐवजी मटका ,जुगाराचा अड्डा, शोधायची वेळ भ्रष्ट अधिकाऱ्यांनी तरुणांवर आणली आहे.वारंवार पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा शहरात सुरू असलेले धंदे बंद करा म्हणून .त्याकडे डोळेझाक केली जात आहे.
अवघ्या दहा वीस रुपयांचा मटका ,दारू तरुण पिढीचे आयुष्य उध्वस्त करत आहे.याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा दोन दिवसात अवैध धंदे बंद करा,अन्यथा पोलिस आयुक्त यांच्या कार्यालयावर बेधडक मोर्चा काढण्यात येईल ,असा इशारा यावेळी दिला.
शहरात पोलिस आयुक्त सहकाऱ्यांसमवेत अमृत महोत्सवाचा आनंद लुटत असले तरी शहरातील जनता मात्र अवैध धांद्यामुळे आनंदोत्सव साजरा करू शकत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. देशात नुकताच आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. हर घर तिरंगा हे अभियान राविण्यात आले. अवैध धंदे बंद करण्याचे पाऊल उचलले असते, तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्याचा आनंद मिळाला असता. परंतु या देशातील नागरिक आता पूर्णपणे अवैध धंद्याला कंटाळून गेले आहेत. दिवसेंदिवस शहरातील अवैध धंदे वाढतच चालले आहे. आता या अवैध धंद्यांमुळे सामान्य नागरिकांच्या आत्महत्या होण्याची पोलीस प्रशासन वाट पाहत आहे काय ? असा संतापजनक सवालही अयाज शेख यांनी उपस्थित केला.
यावेळी, तमजित गोगी, रवींद्र बनसोडे,झहीर कुरेशी, शाहबाझ मुत्वल्ली, मशाक तांबोळी, सद्दाम बिजापुरे रियाज पटेल,ख्वाजा शेख,अल्ताफ शेख,अकील पठाण,सोहेल पठाण, तोफिक बागवान, रेहान गदवाल, आरिफ चांदा,अजय काळे,शुकुर तांबोळी, तौफिक चांदा, जितेश स्वाके,बालाजी लंचपल्ली ,रिजवान गदवाल , जुबेर मुल्ला,अझहर शेख,मुसा शेख,इस्माईल आर्या, अमन मौलवी, अजीम शेख, यासर पठाण,इस्माईल शेख,शोहेब शेख, साजिद शेख,शाहिद शेख, शाहनवाज छुरी, आसिफ चौधरी, गौस शेख, व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.



















