सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या आवारात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत रानभाज्या व खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी या महोत्सवाचे उद्घाटन झाले.
पहिल्या दिवशी मिळालेल्या प्रतिसादनंतर दुसऱ्या दिवशी त्यापेक्षा प्रचंड असा प्रतिसाद महोत्सवाला दिसून आला, भाजीपाला मार्केट पेक्षा जास्त गर्दी याठिकाणी दिसून आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे हे स्वतः बराच वेळ महोत्सवात थांबून होते त्यांनी फिरून सर्वत्र पाहणी करत बचतगटाशी संवाद साधला.
नागरिकांनी पिशव्या भरून भरून याठिकाणी भाज्या खरेदी केल्याचे पाहायला मिळाले. नेमक्या रानभाज्या काय असतात हे पाहण्यासाठी सुद्धा अनेक लोक आले होते त्यांनी बऱ्याच भाज्या खरेदी केल्या.























