सोलापूर – कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदी मनिष बलभीम सुरवसे यांची निवड राज्य़ अध्यक्ष मा.ॲङ. कृष्णा इंगळे यांनी पत्राद्वारे जाहीर केली.
मनिष सुरवसे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची कास धरुन विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांना प्रमाण माणून सामाजिक विषयावर ते सतत लिखान करत असतात. त्यांचे ‘जाणार कुठे जथ्था ?’ आणि ‘संविधान लोकशाही आणि बहुजन – जाणीव आणि जागृती’ हे दोन पुस्तके प्रकाशित झालेले आहेत.
ते सोलापूरातील RTO कार्यालयात कार्यरत आहेत. मागील 10 वर्षापासून महासंघाच्या जिल्हा सचिव पदावर काम केले आहे. त्यांच्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्र राज्य़ अध्यक्ष मा.कृष्णा इंगळे साहेब यांनी त्यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड केली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव नामदेवराव कांबळे, कार्याध्यक्ष गणेश मडावी, अति.सरचिटणीस सुरेश तांबे, सुधीर चंदनशिवे, विभागीय अध्यक्ष राजाराम इंदावे, सोलापूर जिल्हा खातेनिहाय संघटनेचे जि.प.शाखेचे अध्यक्ष अरुणभाऊ क्षिरसागर, सिव्हिल शाखेचे सचिन सोनवणे, महसूल शाखेचे प्रसाद सोनवणे, कोषागार शाखेचे कुलदीप सोनवणे, विद्यापीठ शाखेचे एम.एम.हैनाळकर, शिक्षक शाखेचे श्रीशैल कोरे, विठ्ठल मोरे, एस.ए.लोहार, लक्ष्म़ण गायकवाड, अनिल धिमधिमे, किशोर कांबळे, सोमलिंग कोळी, शाहू दावणे, शिवाजी राठोड यांच्यासह संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.



















