सोलापूर : आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 17 सप्टेंबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत प्रलंबित प्रश्न, अर्ज, तक्रारी यांचा निपटारा करण्यासाठी सेवा पंधरवडा या उपक्रमाचा शुभारंभ यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे, गटविकास अधिकारी जसमीन शेख, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांची उपस्थिती होती.
यावेळी सीईओ स्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या संकल्पनेखाली 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. आपणाला या 15 दिवसात नागरिकांना जास्तीत जास्त सेवा द्यायची आहे. सर्व ग्रामपंचायत मध्ये किती अर्ज पेंडिंग आहेत, त्यासोबत प्रलंबित सर्व प्रकरणांचा निपटारा करा अशा सूचना दिल्या..




















