सोलापूर-स्वच्छ भारत अभियांन (नागरी) २.० चे वर्ष पूर्तता तसेच स्वच्छ भारत अभियांनाची ८ वर्ष पूर्ण झाली आहे. या अनुषंगाने गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालया मार्फत दि. १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२२ हा पंधरवडा “स्वच्छ अमृत महोत्सव” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने विविध उपक्रम सोलापूर महानगरपालिकेकडून राबविण्यात येणार आहेत.
त्या अनुषंगाने चार हुतात्मा चौक (पार्क चौक) येथे शालेय विद्यार्थी सोबत भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या भव्य रॅली सह शहरात 22 ठिकाणाहून रॅली चे नियोजन करण्यात आले होते. तसेच सिद्धेश्वर मंदिर परिसर, भुईकोट किल्ला परिसर व कोटणीस स्मारक परिसर येथे स्वच्छता मोहिमेचे अयोजन करण्यात आले होते.या भव्य रॅलीचे उदघाटन पोलीस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आले.
या रॅली मध्ये शहरातील एकूण 22 ठिकाणाहुन रॅली काढण्यात आले .त्यामध्ये जवळपास 45 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.या रैली मध्ये पथनाट्य, लेझीम,झांज पथक आधी सहभागी झाले होते.यावेळी उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील, उपशिक्षणाधिकारी सुधा साळुखे , प्रशासनाधिकारी संजय जावीर,सफाई अधिक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधिक्षक अनिल चराटे,नागेश मेनगुळे, स्वप्निल सोलनकर,तेजस शाहा, गिरीश तंबाके तसेच सोलापूर शहरातील विविध महाविद्यालयातील शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२२ हा पंधरवडा “स्वच्छ अमृत महोत्सव” म्हणून साजरा करण्यात येत आहे .त्या अनुषंगाने आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात अली. शहरातील विविध ठिकाणाहुन जवळपास 22 ठिकाणी ही रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅली मध्ये 45 हजार विद्यार्थी सहभाग झाले होते.या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी तसेच शिक्षक मोठ्या संख्येने सहभाग झाले होते. त्याचबरोबर या रॅलीच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण संदर्भातील माहिती व जनजागृती होण्याकामी ही रॅली काढण्यात आल्याची माहिती आयुक्त पि.शिवशंकर यांनी दिली.
यावेळी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी उपस्थिती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की आपण वैयक्तिक स्वच्छता ज्याप्रमाणे करतो त्याचप्रमाणे सार्वजनिक ही स्वच्छता व्हायला हवी त्याचबरोबर घरामध्ये ओला कचरा, सुका कचरा ही वर्गीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर स्वच्छ अमृत महोत्सव हा सप्ताहा मध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना त्यांनी आवाहन केले की आपल्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरात स्वच्छतेबाबत व कचऱ्याचे वर्गीकरण करण्याबाबत जनजागृती करण्यात यावी असे आवाहन केले.
























