सोलापूर : महासंघाच्या मागण्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन कर्मचा-याचे न्यायीक प्रश्न सोडवू व कर्मचा-यांना जूनी पेन्शन लागू करणे विषयी पुढील अधिवेशनात प्रयत्न करणार असे आश्वासन आमदार समाधान आवताडे यांनी दिले यासह जिल्हा परिषद कर्मचा-यांनी लोकाभिमुख कामे करुन जनतेचा विश्वास संपादन करावा अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाची राज्य कार्यकारीणी सभा रविवार 18 सप्टेंबर रोजी फरताळे सभागृह, पंढरपूर येथे महासंघाचे कार्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. यावेळी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे केंद्रीय सदस्य प्रशांत जामोदे, कविता बोंद्रे, ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष संजीव निकम, लेखा कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस संजय महाळंकर, राज्य कृषि तांत्रिक कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस सचिन चव्हाण, नर्सेस संघटनेच राज्य अध्यक्षा शोभा खरनार, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघटनेचे राज्य अध्यक्ष ठाकूर तर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेश देशपांडे, शरद भुजबळ, लक्ष्मण वंजारी, सुनंदा सुरवसे, पांडुरंग कविटकर, गुरुनाथ जाधव, प्रफुल्ल माळी, संदिप खरबस. कानिफनाथ चव्हाण, आदी उपस्थित होते.
सदर सभेस राज्यातील २४ जिल्हातील महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. दुपारनंतर जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या हितासाठी व उन्नतीसाठी ज्या ज्या अधिकारी व कर्मचारी व पत्रकार बंधू यांनी सहकार्य केले त्यांना कृतज्ञता सन्मान सोहळयामध्ये विविध पुरस्कार देऊन गौरविणेत आले. तसेच जिल्हा परिषदेतील पत्रकारांना कर्मचारी मित्र पुरस्कार देण्यात आला.
यावेळी महासंघाचे राज्य अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांना कर्मचारी शिरोमणी पुरस्कार देण्यात आला व विविध उपक्रम राबवून ज्यानी सोलापूर जिल्हा परिषदेच्या नावलौकीक उंचावले असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना कर्मचारी आदर्श पुरस्कार देऊन गौरविणेत आले. सदर प्रसंगी कर्मचा-यांच्या हिताचे व महत्वाचे जलद गतीने सोडविलेबददल उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, ईशाधीन शेळकंदे व शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना कर्मचारी गौरव पुरस्कार देण्यात आला तर पंढरपूर व मंगळवेढा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशात काळे व शिवाजी पाटील याना व उप अभियंता दिलीप गोंड्रे व बाळासाहेब नकाते यांना कर्मचारी गौरव पुरस्कार देऊन गौरविणेत आले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन शरद चाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश बनसोडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी राजेश देशपांडे, दिनेश बनसोडे, सुरेश राठोड, सचिन मायनाळ, पांडुरंग कविटकर, संतोष शर्मा, देवा वामघमारे, प्रफुल्ल माळी, पांडुरंग शिंदे, कानिफनाथ चव्हाण, संजय देशपांडे यांनी परिश्रम घेतले.




















