मौजे मार्डी ता. उ. सोलापूर येथील वडार गल्ली मध्ये असणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून सरळ रिकामे रस्त्यावरून सुध्दा चालता येत नाही अशी स्थिती आहे. या वर्षी झालेल्या सलग पावसाळ्यामुळे तर रस्ता आणखीनच खराब झाला आहे. रस्त्यावरून चालताना महिला, लहान मुले यांना तारेवरील कसरत करावी लागत आहे.
रस्त्यावर पाणी साचल्यामुळे दुचाकी वाहने घसरुन पडण्याचे प्रमाण तर फारच वाढले आहे . गटार व्यवस्थित नसल्यामुळे गटारीचे सर्व पाणी रस्त्यावर येते त्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढले आहे. या होणाऱ्या रोगराईला जबाबदार कोण ? सदर रस्त्यासाठी 4 वर्षे पासून ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करून ही त्याकडे ग्रामपंचायत लक्ष देत नाही.
गावातील प्रत्येक गल्ली बोळात गटार रस्ते व्यवस्थित झाले आहेत. तरी वडार गल्ली रस्त्याचे व गटारीचे काम झाले नाही. येणाऱ्या आठ दिवसात दोन्हीही कामाची सुरवात झाली नाही तर वडार समाज पुढील सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकेल असा इशारा देण्यात आला आहे.


















