मुंबई : राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येत्या काळात राज्यभरातील सर्व अंगणवाड्यांचा चेहरा बदलण्याचा निर्णय घेतलाय. अंगणवाडी सेविकांपासून ते पालण पोषण, आहार, आरोग्य यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
तसेच मुंबईतील अंगणवाड्यांचा चेहरा मोहरा बदलण्याचा त्यांचा प्रयत्न असून मुंबईतील ४८०० अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी मुंबईकरांना आवाहन केले असून लोढा यांच्या आवाहनाला दानशूर मुंबईकरांकडून जोरदार प्रतिसाद मिळतयं आत्तापर्यंत ५०० जणांनी अंगणवाडी दत्तक घेण्याची तयारी दर्शवली असल्याचे त्यांनी सांगितले…



















