मुंबई : मुंबईच्या चेंबरमध्ये रुपाली चंदनशिवे हत्येनंतर मुंबईत लव्ह जिहादचा मुद्दा तापू लागला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढांनी रुपालीच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. माध्यमांशी बोलताना लव्ह जिहादच प्रकरण आहे की नाही माहिती नाही, पोलीस तपास करत आहेत. पालकमंत्री या नात्याने मी आज त्यांचा घरी जाऊन आलो हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालावे आणि आम्ही त्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांचा पाठीशी आहोत असे नामदार लोढा यांनी सांगितले….


















