सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये गुरुवारी केवळ जिल्हा नियोजन समितीचीच चर्चा होती. जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रजेवर जाण्याचा आदेश दिला. त्यांच्या कारभाराची चौकशी चार सदस्य समितीकडून होणार आहे त्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी चौकशी समिती सुद्धा नेमल्याचे समोर आले आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील जलजीवन मिशन अंतर्गत 36 कोटीचे टेंडर काढण्यात आले असून सर्व कामांची वर्क ऑर्डर कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आले आहेत. टेंडर प्रक्रियेत ठराविक मक्तेदारालाच जास्त टेंडर दिल्याची तक्रार भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी केली. तसेच कोळी यांचे टेक्निकल काम व्यवस्थित आहे ते टेक्निकलमध्ये कुठं चुकत नाहीत मात्र टेंडर मध्येच घोळ घालतात स्पर्धा होऊ दिली जात नाही. असे आरोप केले.
सुभाष देशमुख यांच्यानंतर आमदार यशवंत माने आमदार राम सातपुते यांनीही कोळी यांच्या तक्रारी केल्या. यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकारी अभियंता कोळी यांना रजेवर जाण्याचा आदेश दिला. याचे पडसाद सध्या जिल्हा परिषदेत उमटले आहेत जरी अधिकारी समोर येऊन बोलत नसले तरी प्रत्येक अधिकाऱ्यांनी कोळी यांची बाजू घेतली आहे.
कार्यकारी अभियंत्याला रजेवर पाठविण्याचा अधिकार जिल्हा नियोजन समितीला नाहीत, चौकशी लावण्याचे आहेत. त्यांची संबंधित विभागाच्या सचिवांकडे तक्रार करू शकतात, सचिवांना रजेवर पाठविण्याचे अधिकार आहेत. कोळी यांनी रजेवर जाऊ नये, एकीकडे सुभाष देशमुख कोळी यांचे टेक्निकली काम चांगलं आहे, चूक होत नाही, टेंडर प्रक्रिया तर ऑनलाइन आहे. काय व्हायची ती होऊ दे चौकशी अशी चर्चा अधिकाऱ्यांमधून दबक्या आवाजात सुरू आहे.
मुळात आमदार हे जिल्हा नियोजन समितीचे निमंत्रित सदस्य आहेत, त्यांच्यासाठी विधानसभा सभागृह आहे, त्यांना जिल्हा परिषदेच्या कामकाजात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही त्यांना तक्रारच करायची असेल तर अधिवेशनामध्ये आवाज उठवू शकतात, संबंधित मंत्र्यां कडे तक्रार करू शकतात. असे ही बोलले जात असून डीपीसीत जिल्हा परिषदेचा विषय सुभाष देशमुख यांनी घेण्यामागे काहीतरी गोम असल्याची चर्चा ऐकण्यास मिळते.


















