सोलापूर : मोहोळ तालुक्यातील वाफळे ग्रामपंचायत सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. काही दिवसांपूर्वी वाफळे येथील सचीन राजू चव्हाण या ग्रामस्थाने अंगावर पेट्रोल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला. माणिक नलावडे यांनी ग्रामपंचायतीची बेकायदेशीर जागा हडप करून व्यापारी गाळे बांधले . या बेकायदेशीर कामकाजाबाबत आंदोलन करण्यात आले तेव्हा झेडपी प्रशासनाकडून गाळे सील करण्यात आले होते. कोणती ही कायदेशीर परवानगी न घेता माणिक नलावडे यांनी सिल तोडून व्यापारी गाळे खुले केले आहेत. यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती.
दरम्यान शुक्रवारी सीईओ यांना दिलेल्या निवेदनात मौजे वाफळे येथील माणिक नारायण नलवडे यांना सन २०१० मध्ये ग्रामसभा दि. १५/०८/२०१०, ठराव क्र. १५ अन्वये गावठान मधील दिलेली जागा शासन निर्णयानुसार सदरचे अतिक्रमण यापूर्वी नियमानुकूल करण्यात आलेले आहे, परंतु सचिन अर्जुन चव्हाण यांनी हेतुपुरस्कृत राजकीय दृष्टिकोनातून अतिक्रमण काढणेबाबत तक्रारी अर्ज दिलेला आहे.
या तक्रारी अर्जावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समक्ष सुनावणी होवून विशेष ग्रामसभा घेण्याबाबत आदेशीत केलेले होते. यावर ग्रामसभा दि. २३/०३/२०२२, ठराव क्र. २ आम्ही गावठाणामधील सर्व अतिक्रमण शासन निर्णयानुसार नियमाकुल होणेबाबत ग्रामसभामध्ये बहुमताने मान्यता दिलेली आहे. याबबातचा ग्रामसभा ठराव सोबत जोडत आहे.
त्यामुळे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कोणत्याही प्रकारची प्रशासकीय कारवाई करण्यात येवू नये. अन्यथा आम्हाला जि.प.समोर आमरण उपोषणास बसावे लागेल, असा इशारा सदस्य डॉ दादासाहेब पाटोळे यांनी दिला आहे. पहा ते काय म्हणाले..

















