सोलापूर – नमामी चंद्रभागा उपक्रमांतर्गत पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीच्या ठिकाणी स्वच्छतागृहे व स्नानगृहे तसेच पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिल्या.
जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निजी कक्षामध्ये माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी ग्रामसेवक यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, या बैठकीस माळशिरसचे गट विकास अधिकारी विनायक गुळवे, पंढरपूरचे गटविकास अधिकारी किरण काळे उपस्थित होते. पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील घनकचरा व्यवस्थापन सल्लागार मुकुंद आकुडे , सांडपाणी व्यवस्थापन सल्लागार प्रशांत दबडे, सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार यशवंती धत्तुरे यावेळी प्रमुख उपस्थित होते प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व संत तुकाराम महाराज पालखी मार्ग व तसेच इतर संतांच्या पालखी मार्गावर हरित पट्टा तयार करण्यात येणार आहे. यासाठी वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ग्रामपंचायत आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या. मोठ्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी बाग बगीचे तयार करण्यासाठी यासाठी सर्व ग्रामपंचायतीने आराखडे तयार करून जिल्हा कक्षाकडे पाठवण्याच्या सूचना यावेळी सिईओ दिलीप स्वामी यांनी दिल्या. पालखी मार्गावर ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी पालखी मार्गावर होणारा घनकचऱ्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा प्रस्थापित करण्यासाठी उपाययोजना करणे बाबतच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या याबाबत सूक्ष्म नियोजन करून सदर आराखडा सादर करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
भीमा नदीचा पर्यावरणीय प्रवाह कायमस्वरूपी अबाधित राहण्यासाठी कुठले प्रकारचा घनकचरा तसेच सांडपाणी मिसळणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गावातून नदीच्या पात्रात जाणारे सांडपाणी याची व्यवस्था करण्यासाठी नियोजन करून त्याबाबतचा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत राज्य शासनाकडे सादरीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशा दिन शेळकंदे यावेळी बोलताना म्हणाले , आषाढी यात्रा कालावधीमध्ये घनकचरा व्यवस्थापनांतर्गत ग्रामपंचायतीने प्लास्टिक संकलन केंद्र चांगल्या पद्धतीने केली होती. त्याच धर्तीवर प्लास्टिक कचरा कायमस्वरूपी संकलन करण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे त्यादृष्टीने नियोजन करणेचे सुचना दिल्या. पालखी मार्गावर भाविकांसाठी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था तसेच निवासी व्यवस्था शेल्टर याबाबत हे आराखड्यामध्ये समावेश करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

















