सोलापूर (प्रतिनिधी ) परतीच्या पावसाने सोलापूर जिल्ह्यातील उत्तर आणि दक्षिण तालुक्यातील गावातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अधिकाऱ्यांनी या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यावर अन्याय करू नये, या सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी केल्या.
सोमवारी संपर्क कार्यालयात आमदार सुभाष देशमुख यांनी उत्तर आणि दक्षिण तालुक्यातील कृषी अधिकारी तहसीलदार आणि तलाठ्यांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी दोन्ही तालुक्यातील पिकांच्या नुकसान भरपाई ची माहिती घेतली. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी, तलाठी लवकर पंचनामा करत नाहीत याबद्दल तक्रार केली. यावेळी अधिकाऱ्यांनी शासन निर्णयानुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पंचनामे पूर्ण झाल्याचे सांगत ऑक्टोबर महिन्याचे पंचनामे करण्याचे आदेश नसल्याचे सांगितले.
यावेळी आमदार देशमुख यांनी ताबडतोब राज्याचे सचिव ढवळे यांना फोन करत ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर महिन्याचे पंचनामे करण्याचे आदेश परत लवकर काढावे असे सांगितले. यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले की, उत्तर आणि दक्षिण तालुक्यात 65 मिली पाऊस पडलेल्या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळणार आहे. 65 मी.ली. पेक्षा कमी पाऊस पडलेल्या गावांची पाहणी करून त्याचे पंचनामे त्याच्या सूचना केल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्याना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांची ही बोललो आहोत. त्यांनीही याबद्दल सकारात्मकता दाखवल्याचे सांगितले.
.jpg)


















