सोलापूर : अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळाची अवस्था नावारूपाला असून शैक्षणिक कर्ज वगळता मुदत कर्ज,थेट कर्ज,महिला बचत गट योजना बंद आहेत त्यामुळे अल्पसंख्यांक समाजातील युवकांना छोट्या मोठ्या व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळत नसल्याने ते बेरोजगार आहेत,तरी इतर आर्थिक विकास महामंडळाप्रणे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळास 500 कोटी निधी उपलब्ध करून द्यावे व कामकाज सुरळीत सक्षम होणेसाठी संचालक मंडळ नियुक्त करण्यात यावे अशी विनंती केली.
दुसऱ्या एका निवेदनात आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीना सेमिस्टर प्रमाणे प्रशिक्षण दिले जात नसून भंगार स्वरूपात व बंद अवस्थेत असलेल्या मशनरी, साहित्य साधने यावरच वर्षानुवर्षे प्रशिक्षणाचा भोंगळ कारभार चालू असून,प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणापासून वंचीत राहत असून कुशल कामगार घडवीण्याची संकल्पना कागदावरच दिसत असून कुशल कामगार घडवायचे असतील तर साधन सामुग्री उपलब्ध होणे गरजेचे आहे ,मात्र दरवेळी निरीक्षन हे संस्थेच्या अधीन राहून होत असल्याने संस्थाचालक मालामाल झाले मात्र प्रशिक्षणार्थी अजून ही प्रशिक्षणापासून वंचीत आहे, सुयोग्य कारभार व योग्य प्रशिक्षणासाठी पारदर्शक निरीक्षण निरीक्षण होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या दोन्ही निवेदनाच्या बाबतीत तात्काळ कार्यवाही होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास दिला. यावेळी तालुका प्रमुख सुधीर गोरे, उमाकांत करंडे, समाधान चौरे, विजय साठेसह पदाधिकारी उपस्थित होते.



















