सोलापूर (प्रतिनिधी) : जगण्या इतपत पेन्शन मिळाली पाहिजे. हा अधिकार पेन्शन धारकांचा आहे. देशात 69 लाख पेन्शनर आहेत. पेन्शन हा मूलभूत अधिकार आहे. देशाला घडवणारे पेन्शनर आहेत. सात, आठ डिसेंबरला दिल्लीत भव्य मोर्चासाठी एकत्र जमावे, असे उदगार भीमराव डोंगरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यानी काढले.
ईपीएफ 95 समन्वय समिती राष्ट्रीय संघटन विभाग सोलापूर व एकता संघर्ष मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हास्तरीय भव्य मेळाव्या प्रसंगी काढले. यावेळी अतुल दिघे कोल्हापूर हे म्हणाले 186 उद्योगातील पेन्शनर्स अतिशय तुटपुंजे पेन्शन घेतात.1000 पेक्षा कमी पेन्शन घेणारे 28 लाख पेन्शनर आहेत. दरमहा 9000 पेन्शन व महागाई भत्ता आणि सोयीं सवलती मिळाल्या पाहिजेत. पेन्शनर्सचा जगण्याचा अधिकार सरकार काढून घेत आहे. पेन्शन वाढ करण्याची दानत नाही.
यावेळी महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, कार्यकारी अभियंता आशिष मेहता, अनिल ताराबदकर, पुंडलीक पांडे यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास किरण शहा,पुरुषोत्तम हरणे,दत्तात्रय जामदार, रविंद्र मोकाशी, विनायक गोडसे, शशिकांत ठोकळे, शिवाजी दळवी, बसवराज मसुते, हरिभाऊ नरखेडकर, दिलावर मनेरी, अशोक कोंडगुळे, कुंडलिक मोरे, बाळासाहेब पाटील, शशिकांत ठोकळे, रा.गो. म्हेत्रेस वकील, धोंडिबा बंडगर इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमास वीज वितरण, एस टी. महामंडळ, साखर कारखाने, दुध संघ, नागरी सह. बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सहकारी पतसंस्था, विडी कामगार गिरणी कामगार आशा विविध क्षेत्रातील 1200 पेक्षा अधिक पेन्शनर्स उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्तविक शशिकांत ठोकळे, सुत्र संचालन प्रमोद कोरे आभार प्रदर्शन बाळासाहेब पाटील यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.




















