स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण -2021 मध्ये सोलापूर जिल्हा देशात 46 व्या तर राज्यात द्वितीय क्रमांकावर आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे मार्गदर्शना खाली सोलापूर जिल्हाने देशात टाॅप 50 मध्ये स्थान पटकाविले आहे.
देशात एकुण 709 जिल्हे आहेत. 1000 गुणा पैकी 955.53 गुण सोलापूर जिल्ह्याने प्राप्त केले आहेत. नुकताच केंद्र शासनाचे जलशक्ती मंत्रालयाने अहवाल प्रकाशीत केला आहे.
देशात स्वच्छ जिल्हा म्हणून गौरव झालेला सिधुदूर्ग जिल्हा गुणांकनात देशात दहावा आहे.
राज्यात सिधुदूर्ग पहिला (983.04 गुण ) सोलापूर द्वितीय (955.53 गुण), सांगली तृतीय (939.13 गुण) मिळाले आहेत.
फिडबॅक मध्ये सोलापूर जिल्हा देशात द्वितीय आहे. यंदा पासून फिडबॅक साठी देण्यात येणार पुरस्कार जलशक्ती मंत्रालयाने बंद केला आहे.
सिईओ दिलीप स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली सर्वोत्तम कामगिरी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेने केली आहे. महिला व बाल कल्याण विभाग, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, उमेद सह सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मोठे योगदान दिले आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने पुढाकार घेतला होता. सिईओ दिलीप स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, शिक्षणाधिकारी डाॅ. किरण लोहार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार यांनी सहकार्य केले आहे.


















