सोलापूर : सोमवारी सकाळी सहाच्या दरम्यान विजापूर रोड येथील संभाजी महाराज तलाव अर्थात कंबर तलावात एका 25 वर्षे युवतीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचं दिसून आलं. आरती प्रकाश भंडारी राहणार जुना बिडी घरकुल मुळेगाव रोड सोलापूर असे मयत तरुणीचे नाव आहे.
कंबर तलावात मृतदेह दिसल्यानंतर नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रुग्णसेवक लादेन यांना बोलावून घेतले दिली लादेन हे स्वतः घटनास्थळी त्वरित दाखल होऊन पाण्यात तरंगत असलेले सदर युवतीचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. ही माहिती मिळताच तलावाजवळ अनेक नागरिकांनी गर्दी केली होती.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आरती ही आपल्या घरात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागात म्हणजेच आईने रागावल्याने वाईट वाटून घेऊन घरातून दिनांक 27 ऑक्टोबरच्या सायंकाळपासून निघून गेली त्यानंतर काही वेळाने तिने मला माफ करा असा मोबाईलवर मेसेज पाठवला. त्यामुळे घरातील लोकांना धक्काच बसला. त्यांनी तिला सतत मोबाईलवर फोन केला असता मोबाईल 28 ऑक्टोबरच्या दुपारी पर्यंत वाजत राहिला आपली मुलगी याआधीही अशाच रागाच्या भरात घरातून निघून जाऊन एखाद्या मैत्रिणीच्या घरी राहिल्याने आईनेही थोडेफार दुर्लक्ष केले. मात्र दुर्दैव आरतीचा मृतदेह कंबर तलावात आढळून आल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली.
आरतीच्या वडिलांचे निधन झाले असून घरात आई एकमेव कमावती व्यक्ती आहे आणि आरतीला आई , दोन बहिणी व एक भाऊ असा परिवार होता.


















