Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर झेडपीच्या ‘गामुकां’ नंतर ‘द होकमुरू’ची चर्चा ; 8 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ; भास्कर बाबर यांच्यावरही ताशेरे, काय आहे प्रकरण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 November 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 






सोलापूर : जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना 25 हजाराची लाच घेताना अटक झाली या अँटीकरप्शनच्या रेड नंतर जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागाचा कारभार चांगला चव्हाट्यावर आला आहे आता अनेक जण आपल्या तक्रारी घेऊन माध्यमांसमोर येत आहेत प्राथमिक शिक्षण विभागातील काही कर्मचाऱ्यांनी संगणमताने मोठा भ्रष्टाचार केल्याची तक्रार जिल्हा परिषद कामगार कर्मचारी युनियनचे नेते साथी बशीर अहमद यांनी केली आहे. अद्याप या प्रकरणाची चौकशी चालू असून या प्रकरणात सुमारे आठ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप बशीर अहमद यांनी केला आहे.

प्राथमिक शिक्षण विभागात वर्षानुवर्षे टेबलाचला चिकटून बसलेले ‘गामुका’ अर्थात गाडेकर, मुतवल्ली व कांबळे यांच्यावर ताशेरे उडत असतानाच ‘द होकमुरू’ म्हणजेच प्राथमिक शिक्षण विभागातीलच वरिष्ठ सहाय्यक दयानंद कन्ना, कनिष्ठ प्रशासन अधिकारी तजम्मुल मुतवल्ली, विस्तार अधिकारी (ऊर्दू) अतहर दफेदार, लिपीक चंद्रकांत होटकर, अधिक्षक प्रताप रूपनर यांचे काही प्रकरणे समोर येत आहेत. जिल्हा परिषद कामगार कर्मचारी युनियनचे नेते साथी बशीर अहमद यांनी कोटयावधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला असून त्यांनी सोमवारी माध्यमांना पत्र देऊन चौकशी अधिकारी भास्कर बाबर यांच्यावरही ताशेरे ओढले आहेत. 

दरम्यान बशीर अहमद यांनी दिलेल्या पत्रात काय म्हटले आहे वाचा…

सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक दयानंद कन्ना, कनिष्ठ प्रशासन अधिकारी तजम्मुल मुतवल्ली, विस्तार अधिकारी (ऊर्दू) अतहर दफेदार, लिपीक चंद्रकांत होटकर, अधिक्षक प्रताप रूपनर या सर्वांनी मिळून संगनमताने पदाचा गैरवापर करून दि.०२ मे २०१२ चे शासन निर्णय डावलून नविन भरती केली आहे. १२/०७/२००४  ०१/०४/२०११ रोजीचे शासन निर्णयामधील ज्या शिक्षकेत्तर कर्मचान्यांना नावानिशी मान्यता दिली आहे. त्यांना बाजूला ठेवून सोलापूरातील १४ शाळेतील २८ शिक्षकेत्तर कर्मचान्यांना मान्यता देवून वेतन काढले असून महाराष्ट्र शासनावर कोटयावधी रुपयेचा आर्थिक भार पडला आहे. 

याबाबतची पुराव्यानिशी तक्रार सोलापूर जिल्हा परिषद कामगार कर्मचारी युनियनचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी शासनाकडे केली होती. शासनाने सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशीअंती कार्यवाही करून अहवाल पाठवण्याचाच आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांना दिनांक १८/०२/२०२०, २०/०५/२०२०, २७/०७/२०२०, २०/०८/२०२० तसेच ०१/०६/२०२१ रोजी चौकशी करून अहवाल सादर करण्यासंबंधी आदेश दिले होते. परंतू माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी चौकशी न करता सदस्ये प्रकरण दडपल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वारंवार माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना लेखी व तोंडी सूचना देवूनही वरिष्ठांचे आदेशानुसार कार्यवाही करून अहवाल सादर न केल्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांचे गैरशिस्तीच्या वर्तनाबाबत त्यांचेविरुध्द योग्यती कारवाई करावी अशी तक्रार युनियनचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी केलो होतो. अद्याप त्यांचेवर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांना निलंबित करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.

यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या निजीकक्षेत दिनांक १९/१०/२०२२ रोजी बैठक आयोजित करुन त्याची प्रत तक्रारदारास दिली. सदर बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तक्रारदार यांना बाजू मांडण्यास सांगितले. त्यानुसार साथी बशीर अहमद यांनी बाजू मांडताना सांगितले की, प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक दयानंद कन्ना, कनिष्ठ प्रशासन अधिकारी तज्जमुल मुतवली, विस्तार अधिकारी (ऊर्दू) अतहर दफेदार, लिपीक चंद्रकांत होटकर, अधिक्षक प्रताप रूपनर यासर्वांनी संगनमताने पदाचा गैरवापर करून मनमानी पद्धतीने दि. ०२ मे २०१२ या शासन निर्णय डावलून बेकायदेशीरपणे नविन भरती केली.

महाराष्ट्र शासनाने सन २००० ते २००४ या कालावधीत राज्यात सेवेत असलेले शिक्षकेत्तर कर्मचारी लिपीक, शिपाई यांना शासन निर्णय दि.०१/०४/२०११ अन्यये राज्यातील १९३ लिपीक व १९३ शिपाई यांच्या पदाला २००४ पासून नांवानिशी मान्यता दिली आहे. वास्तविक पाहता शासनाकडील १०३ शिपाई व ९२ लिपीक अतिरिक्त शिक्षकेत्तर कर्मचान्यांचे समायोजन करून उरलेले ९३ शिपाई व ७२ लिपीक यांना मान्यता देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. दि.१२/०७/२००४, ०१/०४/२०१९ रोजी मंजूर केलेले शिक्षकेत्तर पदावर कार्यरत असणान्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नाही. ०८/१०/२०१०, २३/०८/२०१७ रोजीच्या शासन परिपत्रकाचे उल्लंघन करून दिनांक १२/०७/२००४, ०१/०४/२०११ रोजीचे शासन निर्णयामधील नावे नसलेले शिक्षकेत्तर कर्मचान्यांना वैयक्तीक मान्यता देवून फोटयावधी वेतन काढून मुळ शिक्षकेत्तर कर्मचान्यांना वंचित ठेवून त्यांचेवर प्रशासनाने अन्याय केला आहे अशी बाजू साथी बशीर अहमद यांनी मांडली. माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी बाजू मांडताना सांगितले की, प्राथमिक शिक्षण विभाग (आस्थापना शाखा), कनिष्ठ प्रशासनाधिकारी तजम्मुल मुतवल्ली यांनी यासंदर्भातील मुळ नस्त्या दिल्या नाहीत. सामान्य प्रशासन विभागाकडून मला तपासणी करण्यासंदर्भात कोणतेही आदेश प्राप्त झालं नाहीत. आस्थापना शाखेकडून मुळ नस्त्या ताब्यात देण्याची मागणी शिक्षणाधिकारी यांनी केली.

यावेळेस मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती चंचल पाटील, प्रशासनाधिकारी सचिन साळुंखे, लिपीक मोहित बाघमारे, वरिष्ठ सहाय्यक श्रीमती कांबळे, तक्रारदार साथी बशीर अहमद, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर इतर कर्मचारी स्टॉप उपस्थित होते. अशी माहिती जि.प. कामगार कर्मचारी युनियनचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी दिली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! बापू बांगर व डॉ दिपाली धाटे यांची बदली ; तेजस्वी सातपुते यांना पदस्थापना, दिपाली काळे पुन्हा सोलापूरला

Next Post

सोलापुरात अब्दुल सत्तारांच्या प्रतिमेला जोडे मारून फोटोचे दहन ; पन्नास खोके खाऊन माजलेत बोके…..

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात अब्दुल सत्तारांच्या प्रतिमेला जोडे मारून फोटोचे दहन ; पन्नास खोके खाऊन माजलेत बोके.....

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002472
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group