Friday, October 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरातून फरार सोन्याला पोलिसांनी पुण्यात ठोकल्या बेड्या ; वैभव वाघे खून प्रकरण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 February 2025
in crime
0
प्रमोद गायकवाड यांच्यावर मोक्का लावा अन् एडवोकेट संतोष न्हावकर यांची नियुक्ती विशेष….
0
SHARES
750
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरातून फरार सोन्याला पोलिसांनी पुण्यात ठोकल्या बेड्या ; वैभव वाघे खून प्रकरण

सोलापूर- सिध्दार्थ हौसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड, लाकडी दंडुका, फरशी, पट्टा या प्राणघातक हत्यारासह अमानुष मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी तसेच पिडीत महिला, रितेश विलास गायकवाड, निलेश शिरसे, सागर शिरसे, सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमोद गायकवाड, प्रसेनजीत उर्फ लकी गायकवाड, हर्षजीत गायकवाड, संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड, मनोज राजू अंकुश, सनी निकंबे व योगेश ऊर्फ सोन्या गांधी अस्वले यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस स्टेशन येथे वैभव वाघे याचा खून व जखमी साक्षीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

दि.१/१/२५ रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास भीमा कोरेगाव पुणे येथे शौर्य दिन साजरा करण्यासाठी सिध्दार्थ हौसिंग सोसायटीतील रिंकि शिवशरण, अदित्य दावणे, पुथ्वीराज शिरसे व रितेश गायकवाड हे थांबले असताना त्यावेळी बुद्ध विहारजवळ सर्व आरोपी हे त्यांच्या कुटुंबासह थांबलेले होते. त्यावेळी सनी निकंबे हा दारु पिऊन पिडीत महिलेच्या अंगावर आला, प्रमोद गायकवाड पट्टा काढून अदित्य दावणे यास मारहाण करू लागला. त्यावेळी ऋतूज गायकवाड व रिकी शिवशरण यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता प्रमोद गायकवाड याने प्रसेनजीत उर्फ लकी, हर्षजीत उर्फ विकी व संजय उर्फ सोन्या या तिघांना आवाज देऊन “गाडीतील रॉड काढून घेऊन या, या लोकांना माज आलेला आहे, कुठले भिकारडे येथे आलेले आहेत”, असे ओरडून शिविगाळी करून त्यांना बोलावून घेतले. सर्वजण लोखंडी रॉड घेऊन आल्यानंतर सर्वांनी मिळून पिडीत महिला, रितेश गायकवाड, सुमित गायकवाड यांना मारहाण केली, त्यावेळी कोण जर यांच्या मदतीला आले तर त्यांना देखील आम्ही सोडणार नाही असे ओरडल्याने कोणी मदतीला आले नाही. परंतु निलेश शिरसे व सागर शिरसे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही सर्व आरोपींनी मारहाण केली. त्यानंतर काही वेळाने वैभव उर्फ बंटी वाघे याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता सर्व आरोपींनी मिळून त्यास मारहाण केली. त्यावेळी वैभव वाघे हा गाडीवरून निघून जाण्याचा प्रयत्न करीत असता समरसेनजीत उर्फ टिपू गायकवाड याने त्याला अडवून पाडले व रस्त्यावरून फारशी उचलून वैभव वाघे च्या डोक्यात घातली. त्यावेळी पुन्हा प्रमोद गायकवाड सह सर्व आरोपींनी मिळून लोखंडी रॉड व लाकडी दंडुकाचे सहाय्याने त्याचे सर्वांगावर मारहाण केली. प्रमोद गायकवाड याने लोखंडी रॉडने वैभव वाघे याचे हात, पाय, तोंड, व डोक्यात मारले, प्रसेनजीत गायकवाड, संजय गायकवाड, हर्षजीत गायकवाड यांनी लोखंडी रोडने त्याचे हातापायावर, डोक्यावर, पाठीवर, व शरीरावर मिळेल तिथे मारहाण केली. अजित गायकवाड व किरण अंकुश यांनी लाकडी बांबूने मारहाण केली. प्रमोद गायकवाड व सर्व आरोपींच्या दहशतीमुळे वैभव वाघे यास सोडविण्यास कोणीही पुढे आले नाही. वैभव वाघे हा मोठमोठ्याने रडत होता परंतु सर्व आरोपी त्यास अमानुषपणे मारहाण करीत राहिले. तो रक्तबंबाळ होऊन पडल्यानंतर सर्व आरोपी निघून गेले. वैभव वाघे यास सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारास दाखल केल्यानंतर दि. ०६/०१/२०२५ रोजी तो मरण पावला.

सदर प्रकरणातील फरार आरोपी योगेश ऊर्फ सोन्या गांधी अस्वले यास पोलिसांनी पुणे येथून अटक करून आजरोजी मे. न्यायालयात हजर केले. पोलिसांनी आरोपीकडे सखोल तपास करणेकामी पोलीस कोठडीची मागणी केली. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन मे. न्यायालयाने आरोपीस १२ फेब्रूवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

यात मुळ फिर्यादीतर्फे अॅड. संतोष वि. न्हावकर, अॅड. वैष्णवी न्हावकर, अॅड. राहुल रुपनर, अॅड. शैलेश पोटफोडे, यात सरकार पक्षातर्फे अॅड. अमर डोके तर आरोपीतर्फे अॅड. कदीर औटी हे काम पाहत आहेत.

Tags: @सोलापूरCrimePramod gaikwadVaibhav vaghe murder case
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात प्रधानमंत्री सूर्य घर योजनेची प्रभावी अंमलबजावणी ; योजना समजून घ्या

Next Post

सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा ; तब्बल 800 नागरिक निघाले… आनंद..उत्साह

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा ; तब्बल 800 नागरिक निघाले… आनंद..उत्साह

सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा ; तब्बल 800 नागरिक निघाले... आनंद..उत्साह

ताज्या बातम्या

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001404
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group