Monday, September 28, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आता केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी ॲग्रिस्टॅक योजना ; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या प्रशासनाला या सूचना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 December 2024
in Agriculture
0
आता केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी ॲग्रिस्टॅक योजना ; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या प्रशासनाला या सूचना
0
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आता केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी ॲग्रिस्टॅक योजना ; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या प्रशासनाला या सूचना

सोलापूर (जिमाका):- राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरीत्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरिता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक ही योजना राज्यात राबविण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येणार असून त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने या योजनेची माहिती तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित ॲग्रिस्टॅक योजनेच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, केंद्रशासन ही योजना राबवत असून राज्य शासनाने ही कृषी क्षेत्रातील डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना अधिक जलद सुविधा देण्यासाठी ॲग्रिस्टॅक ही योजना राज्यात राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करणे व तो सातत्याने अद्यावत करणे या बाबी अंतर्भूत असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक यांनी या ॲग्रीस्टॅक योजनेची प्रथम स्वतः सविस्तर माहिती घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत या योजनेची प्रचार प्रसिद्धी करावी. जेणे करून प्रत्यक्ष योजना सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून आवश्यक असलेली माहिती जलद गतीने प्रशासनाला उपलब्ध होण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सुचित केले. तसेच या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्याकरता त्यांचे सर्व डिटेल्स घेण्यात येणार आहे, असे ही त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाची ही ॲग्री स्टॅक योजना एक पथ पथदर्शक प्रकल्प म्हणून बीड जिल्ह्यात यापूर्वीच राबविण्यास सुरुवात झालेली आहे. ही योजना केंद्र शासनाची महत्त्वपूर्ण योजना असून राज्य शासनाने ही योजना राज्यात अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात बाबत सूचित केलेले आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत कार्यक्षमपणे पार पाडून कृषी क्षेत्रातील डिजिटल सेवांचा वापर शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी व्हावा यासाठी आवश्यक असलेली माहिती अत्यंत बिनचूकपणे शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या ॲप मध्ये भरावी असे निर्देश ही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. ही योजना संपूर्ण राज्यात 16 डिसेंबर 2024 पासून मिशन मोडवर सुरू होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी ॲग्री स्टॅग या योजनेविषयी माहिती दिली. त्यानंतर बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी ऍग्रीस्टॅक योजना बीड जिल्ह्यात कशा पद्धतीने राबविण्यात आली. तसेच ही योजना काय आहे व प्रत्यक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यामध्ये कशा पद्धतीने कामकाज करावयाचे आहे याविषयीची अत्यंत सविस्तर माहिती ऑनलाईनद्वारे दिली.
या बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी हे दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.

Tags: AgristagCollector kumar ashirwadFarmers subsidy
SendShareTweetSend
Previous Post

सुशीलकुमार शिंदे यांचे उपकार माना ; नाहीतर तुमची कधीच पक्षातून हकालपट्टी झाली असती

Next Post

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा जोरदार दणका ; जिल्ह्यातील सरपंचांसह वीस सदस्य अपात्र ; बापरे एका गावात तर…

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
आता केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी ॲग्रिस्टॅक योजना ; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या प्रशासनाला या सूचना

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा जोरदार दणका ; जिल्ह्यातील सरपंचांसह वीस सदस्य अपात्र ; बापरे एका गावात तर...

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001135
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group