भाजपच्या देवेंद्र कोठे यांचा अर्ज दाखल ; मध्य ची जागा जिंकणारच
भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी आपला शहर मध्य या मतदारसंघात कोणताही गाजावाजा रॅली न काढता उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी देवेंद्र कोठे यांच्यासोबत शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, ज्येष्ठ नेते पांडुरंग दिड्डी, रोहिणी तडवळकर, विनायक कोंड्याल, दत्तात्रय गणपा हे उपस्थित होते.
कोठे यांनी कोणतीही रॅली न काढता सिव्हील चौकातील भाजपच्या पक्ष कार्यालयात सर्वप्रमुख नेते एकत्रित झाले. कार्यालयातून हे सर्व नेते शहर मध्य मतदारसंघ कार्यालयाकडे आले आणि त्यांनी आपला फॉर्म दाखल केला.
कोठे म्हणाले, फडणवीस यांच्यावर श्रध्दा व विश्वास होता, त्यामुळे ही उमेदवारी मिळाली, मी आनंदी आहे, जातीयवादावर ही निवडणूक होणार नाही, सर्व समाज माझ्या पाठीशी राहतील, सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे असू द्या, त्यामुळे तुम्ही सर्वांनी देखील माझ्या पाठीमागे खंबीर उभे राहावे. आणि ही मध्याची जागा आपण नक्कीच जिंकू असा आशावाद व्यक्त केला.