सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूरच्या विकासाचे व्हिजन सांगताना जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना केल्या. विमानसेवे शिवाय विकास शक्य नसल्याचे सांगताना बोरामणी विमानतळ होण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार असे सांगितले. तर दुसरीकडे सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी गाळप हंगाम झाल्यानंतर पाडली जाण्याची भाषा त्यांनी केल्याने आता त्याच्या दुटप्पी भूमिकेवरून चर्चेला तोंड फुटले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री विखे पाटील यांनी सोलापूरच्या विकासाचे व्हिजन मांडले. यात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले. विकास आराखडयाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ही भूमिका मांडताना आमदार प्रणिती शिंदेंनी बोरामणी विमानतळ असा उल्लेख केला. तेव्हा हे विमानतळ झालेच पाहिजे ती पाठपुरावा करेन, शिर्डीचे विमानतळ झाले त्याठिकाणी रोज 20 फ्लाईट उतरतात असे सांगताना विमानतळ किती महत्वाचे आहे याचं महत्व त्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधी यांना करून दिले.
त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना एवढ्या दिवस आपण शेतकऱ्यांच्या उसासाठी थांबलो होतो आता सिद्धेश्वर कारखान्याचा गाळ हंगाम झाल्यानंतर चिमणी पाडण्याची कारवाई करू असे सांगतानाच दुसरा मुद्दा आहे तो बोरामणी विमानतळाचा ते सुरू होण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन असे सांगितले. विमानतळ प्रकरणात त्यांची दुटप्पी भूमिका दिसून आली. नक्की पालकमंत्री काय म्हणाले पहा हा व्हिडीओ…



















