Wednesday, September 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सुरेश हसापुरेंनी आणली हायकोर्टातून स्थगिती ; आमदार सुभाष देशमुख यांची मागणी फेटाळली

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 January 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि.१३- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांचे दक्षिण सोलापूरच्या सहकार क्षेत्रात असलेले वर्चस्व मोडीत काढण्यासाठी त्यांच्या  विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या १४ सोसायट्यांच्या चौकशीची मागणी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी केली होती. त्याला मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली.

हसापूरे यांनी मोहिते-पाटील यांच्या नावाने विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या 14 सोसायट्या स्थापन करून त्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा पतपुरवठा केला आहे. या संस्था अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करीत असताना वेळोवेळी या संस्थांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला. सहकार खात्यातील अधिकाऱ्यांनी यापूर्वी या संस्थांच्या आर्थिक कारभाराची चौकशी पूर्ण केली आहे. 

या संस्थांची नोंदणी रद्द करण्याबाबतचा दावाही यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाला होता. परंतु न्यायालयात या संस्थांच्यावतीने सक्षम बाजू मांडल्यानंतर त्यांचा दावा नामंजूर झाला होता. ही वस्तुस्थिती असताना आमदार सुभाष देशमुख यांनी हसापुरे यांचे सहकार क्षेत्रातील वर्चस्व रोखण्यासाठी त्यांच्या 14 सहकारी संस्थांच्या चौकशीची मागणी सहकारमंत्री अनिल सावे यांच्याकडे केली होती. या संस्था बोगस असून त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आमदार देशमुख यांचे म्हणणे आहे. 

त्यावरून सहकार विभागाने या संस्थांची चौकशी सुरू केली होती. त्या विरोधात 14 सोसायट्यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देऊन चौकशीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. 

सहकार खात्याने सुरू केलेल्या चौकशीला न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी शुक्रवारी स्थगिती दिली आणि सहकार विभागाने चार आठवड्यात लेखी म्हणणे सादर करावे असा आदेश दिला आहे.

2007  साली संस्था नोदणीला रितसर सहकार आयुक्त यांनी मंजुरी दिल्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्या 14 सोसायटीतील शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपये कर्ज वाटप आजतागायत केलेले आहे. व आतापर्यंत कर्ज घेणे, फेडणे व्यवस्थित चालु आहे. याबाबत माजी आमदार रतिकात पाटील पण अधिवेशनात प्रश्न उपस्थित केलेले होते. त्यावेळेही ते वरील विषय फेटाळून लावण्यात आला. तद्नंतर शिवदारे यांनी कोर्टात याचीका दाखल केली होती ते पण फेटाळून लावत हसापुरे यांच्या बाजुने निकाल झालेला आहे. त्यानंतर पुन्हा सहकार मंत्री  असताना सुभाष देशमुख यांची पण तक्रार कोर्टात पेंडीग आहे. आता परत आमदार देशमुख यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा राग मनात धरून परत तक्रार केलेली आहे. तरी आतापर्यंत वरील 14 सोसायटीचे ऑडीट झालेला असून नियमानुसार निवडणूक ही पार पडलेल्या आहेत. सध्या वसुली वाटप व्यवस्थित सुरु आहे. राजकीय सुबुद्धीने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये ही अपेक्षा आहे. -सुरेश हसापुरे
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! सोलापुरात डोक्यात फारशी घालून अनोळखी युवकाचा खून ; चिप्पा मार्केट इथली घटना

Next Post

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी रुजू ; मनीषा आव्हाळे यांच्याकडून घेतला पदभार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी रुजू ; मनीषा आव्हाळे यांच्याकडून घेतला पदभार

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000783
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group