सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पतसंस्था क्रमांक 1 चा नुतन वर्षाच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झाला. यावर्षी दिनदर्शिकेच्या माध्यमातून विषमुक्त अन्न सेवन ही संकल्पना पतसंस्थेने मांडली आहे. त्याचबरोबर या संकल्पनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी दिनदर्शिकेवर क्यूआर कोड दिला आहे. या क्युआर कोडच्या माध्यमातून लोक अधिक माहिती घेवू शकतात.
सीईओ स्वामी म्हणाले, वाढत्या लोकसंख्येला लक्षात घेऊन शेती उत्पादन वाढवण्यासाठी चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी शेती क्षेत्रात हरित क्रांती झाली. त्यानंतर शेती उत्पादन वाढले परंतु हे करीत असताना हरित क्रांती सोबतच शेतीचे रासायनिकरण झाले. हेच शेतीचे रासायनिकरण आज मानवी हितासाठी घातक ठरत आहे. खते व अनेक प्रकारच्या औषधी फवारण्यांमुळे आपले अन्न विषयुक्त झाले आहे. आज आपण विषयुक्त अन्न 100% टाळू शकत नसलो तरी रानभाज्या, रानफळे अथवा परसबागेत स्वतः भाज्या पिकवून बऱ्याच प्रमाणात ते कमी करु शकतो. पतसंस्था क्रमांक 1 ही नेहमीच नविन संकल्पना मांडत असते परंतु यावर्षी पतसंस्थेने तमाम मानवी हितासाठी विषमुक्त आहाराची संकल्पना मांडून मोठे काम केले आहे. याबद्दल मी मनापासून सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन करतो.
दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यानंतर तिळगुळ वाटप व महिला कर्मचाऱ्यांचे हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला. यावेळी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्राप्त पत्रकार विक्रम खेलबुडे, शरीफ सय्यद, गौतम गायकवाड व प्रशांत कटारे यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, यांनीही उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, पंडीत भोसले, सुनील कटकधोंड, समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालकल्याण जावेद शेख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बिरूदेव दुधभाते, गटविकास अधिकारी मोहोळ आनंदकुमार मिरगणे व पंढरपूर प्रशांत काळे, लेखा अधिकारी कैलास कुंभार, वैभव राऊत, चंद्रकांत पाटील, मुनाफ अडते, मल्हारी बनसोडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस.पी.माने यांनी केले तर प्रास्ताविक चेअरमन विवेक लिंगराज तर आभार प्रदर्शन व्हाइस चेअरमन सुहास चेळेकर यांनी केले.
या कार्यक्रमास ज्येष्ठ संचालक श्रीशैल देशमुख, विष्णु पाटील, दीपक घाडगे, हरीबा सपताळे, धन्यकुमार राठोड,दत्तात्रय घोडके, अनिल जगताप,शाहजान तांबोळी, सुंदर नागटिळक, शेखर जाधव, सुखदेव भिंगे, त्रिमुर्ती राऊत, मृणालिनी शिंदे, सुनंदा यादगिरी , सचिव दत्तात्रय देशपांडे आदी उपस्थित होते.