वंदे भारत गाडीच्या वेळेत बदल करण्याची रेल्वे मंत्र्यांकडे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी मागणी केली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. बुधवारी खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांचा सोलापूर पत्रकार संघात वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी महाराज म्हणाले, सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या मुंबई ते सोलापूर दरम्यान लवकरच धावणाऱ्या ‘वंदे भारत’ रेल्वेच्या मुंबई येथून सुटण्याच्या वेळेत बदल करावा असे निवेदन खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना प्रत्यक्ष भेटून दिल्याचे सांगीतले. मुंबईतून ही गाडी दुपारी चार वाजता सुटणार आहे त्या गाडीची वेळ बदलून सायंकाळी सहा करावी अशी मागणी खासदार जयसिद्धेश्वर यांची आहे.
मुंबई सोलापूर प्रमाणेच सोलापूर हैदराबाद या मार्गावर देखील वंदे भारत सुरू करण्याचा प्रस्ताव दिल्याचे खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांनी सांगीतले. यावेळी कोणतेही राजकीय वक्तव्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. आता केवळ ‘वंदे भारत’वर बोलू या असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


















