सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीतून 11 उमेदवारांची माघार ; कोण आहेत हे अकरा उमेदवार
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघार प्रक्रियेच्या दिवशी आपण 11 जणांनी माघार घेतली आहे. विशेष म्हणजे यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने सोलापूरच्या राजकारणात याबाबत चर्चेला ऊत आला आहे.
सोमवार 22 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस होता. सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघासाठी 41 उमेदवारांनी 53 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी अर्ज छाननी मध्ये नऊ जणांचे अर्ज हे अवैध ठरले. त्यामुळे 32 जण निवडणुकीच्या रिंगणात होते अर्ज माघार घेण्याच्या दिवशी 11 जणांनी माघार घेतली आता 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे सोलापूर साठी प्रत्येक बुथवर दोन ईव्हीएम मशीन लावाव्या लागणार आहेत.
काँग्रेस पक्षाच्या वतीने मनीष गडदे, ओंकार ढेकळे प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी, दिनेश म्हेत्रे, हनुमंत सायबोळू, देवेंद्र भंडारे ही नेतेमंडळी जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून होती. अकरा जणांना माघार घेण्यात काँग्रेसचे काँग्रेस पक्ष यशस्वी झाला. वंचित बहुजन आघाडी राहुल गायकवाड, अपक्ष प्रमोद गायकवाड, अपक्ष श्रीदेवी फुलारे हे महत्त्वाचे ठरले आहेत. प्रणिती शिंदे यांच्या अर्जावर हरकत घेतलेले भारत कंदकुरे यांनी हेमगड्डी यांच्यासोबत येऊन अर्ज माघार घेतली. कंदकुरे यांना पत्रकारांनी विचारले असता “मला या लोकांच्या खांद्यावर जायचे आहे त्यामुळे यांच ऐकावं लागणार” असे मजेशीर वक्तव्य केले.