Saturday, October 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर भाजपमध्ये शहराध्यक्ष बदलाचे ‘वारे’ जोरदार ; ही नावे चर्चेत, पण ऐन वेळी या समाजाचा अध्यक्ष होण्याची दाट शक्यता

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 April 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : आमदार तथा प्रदेश संयोजक श्रीकांत भारतीय हे काही दिवसापूर्वी सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उमेदवारांची चाचणी सुद्धा केली आहे. काही नेत्यांच्या त्यांनी गुप्त भेटी घेतल्या. यावरून सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे उमेदवार बदलले जाणार का अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.

काही महिन्यात महानगरपालिका निवडणूक लागेल त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये शहर पातळीवर नवीन नेतृत्वाचा शोध घेतला जात असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमधून ऐकण्यास मिळाली.

पक्षात प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर साधारण खालची फळी बदलली जाते व मे महिन्यात होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर शहरात संघटनात्मक बदल होणार असल्याचे सांगितले जात असून, याकरिता इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

विद्यमान शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी 2019 लोकसभा निवडणुकीनंतर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी घेतली व त्यांचा कार्यकाळ ऑक्टोबर 2022 महिन्यात संपला असून, नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवडीनंतर राज्यात संघटनात्मक बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, सोलापूर शहरात लोकसभा व महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ऊर्जावान व संघटनेला वेळ देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याचं कळतंय.

भारतीय जनता पार्टीत बूथ यंत्रणा ही अत्यंत महत्वाची असून, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे स्वतः राज्यभरात बूथ सक्षमीकरण बैठका आढावा घेत फिरत आहेत, त्यांच्या सुचनेंनंतर देखील शहरातील अनेक बूथ कमिट्या अपूर्ण असल्याने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सोलापूरच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

पदासाठी फिल्डिंग…काय आहे समीकरण… कोण आहेत चर्चेत

शहराध्यक्ष पदासाठी पुन्हा माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, माजी सरचिटणीस हेमंत पिंगळे, माजी सभागृह नेता शिवानंद पाटील, अनंत जाधव, जगदीश पाटील, चन्नवीर चिट्टे, रोहिणी तडवळकर, पांडुरंग दिड्डी, नागेश वल्याळ यांची नावे चर्चेत आहेत. पद निवडीवरून सोलापूरच्या दोन्ही आमदार देशमुख यांची गटबाजी चव्हाट्यावर येते हा आजपर्यंतचा भाजपला अनुभव आहे. त्यामुळे यंदा शहराध्यक्ष निवडताना प्रदेश पातळीवर कामाचा अनुभव पाहून विचार व्हावा अशी अपेक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे.

BRS पक्षाच्या डोकेदुखीमुळे तेलगू भाषिक नाव येण्याची ही शक्यता

सोलापूरच्या भाजपमध्ये पूर्व भागातील तेलगू भाषिकांचा भाजप मधील एक मोठा गट आहे.  तेलगू भाषिकांना शहराध्यक्ष पद द्या अन्यथा सोलापूरात राजकीय एन्ट्री केलेल्या चंद्रशेखर राव यांचा BRS पक्ष लोकसभा व महापालिका निवडणुकीत डोकेदुखी ठरेल व पारंपरिक मतदार असलेला तेलगू भाषिक दुरावेल अशी भीती व्यक्त करत असून, जिल्हाध्यक्ष लिंगायत समाजाला दिल्याने शहराध्यक्ष मराठा किंवा तेलगू भाषिक दोघांपैकी एकाला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

एकूणच सोलापूरची राजकीय आणि सामाजिक समीकरणे पाहता भाजप हायकमांड शहराध्यक्ष पदाची धुरा कोणाच्या हातात देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! सोलापुरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली ; वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने शहरात मोठे नुकसान ; पावसाचे रौद्ररूप पहा या फोटो आणि व्हिडिओमधून

Next Post

मंगळवेढ्यात आवताडेच ‘दादा ‘ ; बाजार समितीवर प्रथमच भाजपची सत्ता ; निवडणूकीत परिचारक – भालके गटाचा पराभव

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मंगळवेढ्यात आवताडेच 'दादा ' ; बाजार समितीवर प्रथमच भाजपची सत्ता ; निवडणूकीत परिचारक - भालके गटाचा पराभव

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002250
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group