Thursday, November 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सीईओ मनीषा आव्हाळे यांच्याकडून मंगळवेढा तालुक्यातील कामांची तपासणी ; या कुलकर्णींच्या कामांवर मॅडम समाधानी ; Solapur

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 October 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी ग्रामीण विकासाची गंगोत्री असणा-या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडील तसेच तालुक्यातील विकास कामांची पाहणी व तपासणी करण्याच्या त्यांच्या अजेंड्यानुसार मंगळवेढा येथील कामांची पाहणी व तपासणी केली. आपण फक्त कार्यालयीन कामकाजच करीत नसून क्षेत्रीय कामात पण लक्ष घालून विकास कामांचा दर्जा तपासणार आहोत व या पध्दतीने जिल्हा परिषद सोलापूरची उत्कृष्ट कामांची धुरा समर्थपणे दुर्गेच्या स्वरुपात सांभाळू याची ग्वाही दिली होती.

बुधवार १८ ऑक्टोबर २०२३ रोजी  आमदार  समाधान आवताडे यांच्या मंगळवेढा तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील त्यांनीच सुचीत केलेले जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील लेखाशिर्ष ३०५४ २०८१ ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरण करणे या योजनेतील भाळवणी ते जित्ती रस्ता या रस्त्याची समक्ष पाहणी करुन आवश्यकतेनुसार कामांची मोजमापे देखील घेवून कामाची तपासणी केली. यावेळी सदर रस्ताचे एकुण ५१०.०० मीटर चे काम सध्या पूर्णत्वाकडे आलेले असून या कामातील बाजूपट्ट्यांचे काम फक्त बाकी आहे. कामाचा बाव, कामाचा दर्जा याही बाबी त्यांनी स्वतः पडताळून पाहिल्या कामातील तांत्रीक बाबींबाबत प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणीच्या वेळी उपस्थित कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांचेशी चर्चा करून शंकांचे निरसन करुन घेतलेले आहे. या नंतर या कामाबाबत त्यांनी एकंदरीतच समाधान व्यक्त केले.

या रस्त्याच्या कामासोबतच ग्रामीण भागातील लहान मुलांना व मातांना आधार केंद्र असे श्री संत चोखामेळा नगर ता मंगळवेढा येथील आंगणवाडीच्या इमारतीचे काम व आंगणवाडीचे कामकाज पाहून इमारतीच्या रंगसंगती बाबत काही मौलिक सूचना दिल्या तसेच आंगणवाडी करीता आवश्यक व लहान मुलांना आकर्षण किया आंगणवाडीची ओढ लागण्याच्या दृष्टीने गरजेच्या असणा-या बाबी अन्य योजनेतून निधी उपलब्ध करुन कामे पूर्ण करुन घेणेबाबत तसेच पोषण आहाराच्या बाबतही नाविन्यपूर्ण सुचना दिलेल्या आहेत. 

आंगणवाडीच्या मुलांच्या उपस्थितीबाबतही आंगणवाडी सेविका व अन्य कर्मचारी यांचेशी संवाद साधून पट संख्या वाढविणेच्या बाबत सुचना दिलेल्या आहेत. यांनतर त्यांनी मंगळवेढा शहरालगतच्या श्री संत दामाजीनगर ग्रामपंचायतीने नागरी सुविधा योजने मधून पूर्ण झालेले बगीच्याचे काम व आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत पूर्ण झालेले सभामंडपाच्या कामाची पाहणी केली व एकुणच मंगळवेढा उपविभागाकडील व पंचायत समिती कडील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा हा ‘ संजय आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये दाखल ; ताईंनी केले स्वागत

Next Post

मुंबई मंत्रालयात स्त्री शक्तीचा जागर ; महीला सचिवांनी वेधले लक्ष, दिला स्वच्छतेचा संदेश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मुंबई मंत्रालयात स्त्री शक्तीचा जागर ; महीला सचिवांनी वेधले लक्ष, दिला स्वच्छतेचा संदेश

ताज्या बातम्या

१५ वर्षांपासून राजूबाई मॅटर्निटी होमचे काम रखडले; महापालिकेचे कोठ्यावधींचे नुकसान झाल्याचा आरोप! मंत्री चंडक कन्स्ट्रक्शन व जबाबदार अधिकाऱ्यांच्या चौकशीची सीए सुशील बंदपट्टे यांची मागणी

१५ वर्षांपासून राजूबाई मॅटर्निटी होमचे काम रखडले; महापालिकेचे कोठ्यावधींचे नुकसान झाल्याचा आरोप! मंत्री चंडक कन्स्ट्रक्शन व जबाबदार अधिकाऱ्यांच्या चौकशीची सीए सुशील बंदपट्टे यांची मागणी

18 November 2026
ब्रेकिंग ! मोहिते पाटील, शिंदे, माने, हसापुरे, पाटील, परिचारक, म्हेत्रे, आवताडे, बागल यांचे अर्ज बाद ; सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख यांचे अर्ज मंजूर

3 November 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2007610
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group