Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राजकीय गुरू-शिष्याचं असं प्रेम कधी पाहिलंय का? मग पहाच एकदा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप सोपल हे हसतमुख व्यक्तिमत्त्व,  आपल्या खुमासदार शैली साठी अख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत, त्यांचं असं कोणतं भाषण नाही की स्टेजवरील आणि समोर बसलेले न हसले असतील. सध्या ते निवांत आहेत मात्र आपल्या बार्शी मतदारसंघावर त्यांची पूर्ण नजर आहे. बुधवारी सोपल साहेब रेस्ट हाऊस मध्ये पत्रकारांशी निवांतपणे गप्पा मारत होते, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, मानाजी बापू पाटील यांची उपस्थिती होती.

अनेक महिन्यानंतर सोपलसाहेब सोलापूरात आले आणि रेस्ट हाऊस वर थांबले असल्याने काही ठराविक पत्रकार त्यांच्यासोबत बसले होते, अनेक किस्से त्यांनी सांगितले, युती सरकारच्या काळात सीना माढा बोगदा, कशाप्रकारे मंजूर झाला, बार्शीला पाणी कसे मिळाले, सीनेत पाणी कसे येऊ लागले याची मुद्देसूद आणि मजेशीर माहिती दिली.

 1995 च्यावेळी त्यांच्यासह जिल्ह्यातील इतर दोन आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी गेले होते या तिघांचे मातोश्रीवर बाळासाहेबांच्या उपस्थितीत औक्षण झाले, मग काही दिवसात त्या दोन आमदारांनी कशी टांग मारली अशी मजेशीर आठवण त्यांनी सांगितली .याच वेळी जिल्हा बँकेचे संचालक तथा काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे हे त्याठिकाणी आले, हसापुरे सोपल साहेबांजवळ गेले त्यांना वाकून नमस्कार करू लागले मात्र सोपल साहेबांनी उठून उलट हसापुरे यांनाच नमस्कार केला. तो क्षण एका पत्रकाराने मोबाईल कॅमेऱ्यात टिपलाच. राजकिय गुरु-शिष्याचं प्रेम किती आहे एकमेबद्दल आदर किती आहे याची जाणीव तिथं उपस्थितांना झाली.

सोपल हे शिवसेनेत आहेत, हसापुरे हे काँग्रेस मध्ये आहेत मात्र राजकारणाच्या पलीकडील आदरातिथ्य कायम आहे. ही दोन नेतेमंडळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अनेक वर्षांपासून एकत्र काम करत आहेत. एका पक्षात काम केले आहे, जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले हसापुरे यांना निराश व्हावे लागले परंतू त्यांच्यासमोर पर्याय नाही. सोपल यांनीही गप्प न बसता आता जो जिल्हाध्यक्ष झालाय ना त्यांच्या वडिलांचे सुरेश मित्र होते हे काय धवलला माहिती नाही काय?तो आदर सन्मान त्याला द्यावा लागेल.

यावेळी डीसीसी बँक निवडणुकीची चर्चा झाली, जिल्हा परिषद निवडणुकीची चर्चा झाली, राज्यातील महाविकास आघाडी सरकार बद्दल चर्चा झाली. राज्यात सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांनी समन्वयाने काम करावे हे सरकार पाच नक्की टिकेल.जर पुन्हा भाजपची सत्ता राज्यात आली असती तर काँग्रेस राष्ट्रवादी वाल्याना भजन करायला जावे लागले असते,असे मजेदार वक्तव्य सोपल यांनी केले मात्र त्या बोलण्यामागील सत्यता तेवढीच होती, कारण भाजपने परिस्थितीच तशी केली होती.

SendShareTweetSend
Previous Post

सुशीलकुमार व सुशील नाव असणाऱ्यांनो तुमच्यासाठी खुशखबर ; 4 सप्टेंबरची आहे विशेष ऑफर

Next Post

गायक मोहंम्मद अयाज यांची इंडिया बुक ऑफ रेकार्डसाठी निवड ; ‘मंद्रुप ते मलेशिया’ एक प्रेरणादायी प्रवास

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

गायक मोहंम्मद अयाज यांची इंडिया बुक ऑफ रेकार्डसाठी निवड ; 'मंद्रुप ते मलेशिया' एक प्रेरणादायी प्रवास

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996486
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group