Solapur | नव्याने आयएएस झालेल्या वाशीमच्या मनीषा आव्हाळे या परिविक्षाधीन अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत झाल्या आहेत, त्यांच्याकडे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रांताधिकारी क्रमांक 2 चा प्रभारी चार्ज दिला आहे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुक्रवारच्या आढावा बैठकीला आवाळे या उपस्थित होत्या, यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला आणि सर्व पत्रकार प्रशासनातील अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या समोर तुम्हाला सोलापुरात सुरुवातीला काम करण्याची संधी मिळाली आहे, सोलापूर हा असा जिल्हा आहे की या ठिकाणी तुम्ही एकदा काम केला तर संपूर्ण राज्यभरात कुठेही काम करा तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही असा अनुभव इथे मिळेल, आणि तुम्ही सोलापूरला आयुष्यात कधीही विसरणार नाही असे मजेदारपणे सांगितले.




















