सोलापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नुकतेच रासप या पक्षाच्या त्याग करून काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले लिंगायत समाजाचे नेते तथा माजी परिवहन समितीचे सभापती विजयकुमार हत्तुरे यांचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रा. भानुदास माळी , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील , शहर कार्याध्यक्ष माजी महापौर संजय हेमगड्डी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार , माजी महापौर अलका राठोड, धनगर समाजाचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य राधाकृष्ण पाटील यांनी जंगी स्वागत केले.
याप्रसंगी विजयकुमार हत्तुरे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात पुन्हा नव्या जोमाने काम करून आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा सत्ता आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले.
ज्येष्ठ नेते अंबादास गुत्तिकोंडा,दक्षिण तालुक्याचे नेते रावसाहेब व्हनमाने,प्रदेश सेवादलाचे सचिव अशोक कलशेट्टी, परिवहन सदस्य तथा सोशल मीडिया प्रमुख तिरुपती परकीपडला, शहर महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे सचिव सुशील बंदपट्टे, जिल्हाध्यक्ष समीर कोळी आदी उपस्थित होते .



















