Saturday, July 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! संतोष धोत्रे झेडपीचे नवे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 September 2021
in solapur
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे यांची नाशिकला बदली झाली त्यानंतर त्यांच्या जागेवर कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती देण्यात आली नव्हती, त्यामुळे या पदावर कोण येणार अशी चर्चा होती.

मात्र अपेक्षेप्रमाणे सातारा येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष धोत्रे यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली असून धोत्रे हे शुक्रवारी पदभार घेण्याची शक्यता आहे. यापूर्वी संतोष धोत्रे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केल्याने त्यांना सोलापूर जिल्ह्याचा चांगला अनुभव आहे.

वैयक्तिक माहिती

श्री संतोष वसंत धोत्रे.

एम. एस. सी. (अँग्री), महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

कार्य अनुभव :

१. महसुल विभागामध्ये एक वर्षे काम सन २००१-२००२

२. परिविक्षाधीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक, नगर ३. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जिल्हा परिषद सोलापूर,

४. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जिल्हा परिषद धुळे,

५. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग 

६. मंत्रालयामध्ये मा.मंत्री, पर्यावरण, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहिले (सन २०१३-१४)

७. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सन २०१५ मध्ये पदोन्नती.

८. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना (३ वर्षे) औरंगाबाद विभाग. ९. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा (३.५ वर्षे) पुणे विभाग.(जिल्हा परिषद सातारा येथे प्रकल्प संचालक या पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळला.)

सोलापूर येथील कामाचा त्यांना दिर्घ अनुभव आहे. राष्ट्रीय स्तरावर त्यांचे शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. किटकनाशके व फळांवरील अवशेष परिणाम यावर त्यांनी शोधनिबंध लिहिला आहे. २००३-४ मध्ये मगर जिल्हयात काम करीत असताना पाथर्डी येथील पाणी टंचाई आराखडा व त्यांची अंमलबजावणी हा पथदर्शी प्रकल्प ठरला. सोलापूर येथे कार्यरत असताना शासनाने  वाढीव पदाचे निर्मिती बाबत नेमणूक आलेल्या राज्यस्तरीय समिती मध्ये त्यांनी काम केले आहे. धुळे येथे पाणी गुणवत्ता व सनियंत्रण या कार्यक्रमाची प्रभावी  अंमलबजावणी केल्यामुळे त्यांची राज्य स्तरीय अभ्यास गटात निवड झाली होती. २०१३-१४ मध्ये राजीव गांधी प्रशासकीय अभियाना मध्ये सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेस प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. जालना येथे जलयुक्त शिवार योजना प्रभावी पणे राबविली आहे. सातारा येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असताना स्वच्छ भारत मिशन ग्रामीण मध्ये सातारा जिल्हा परिषदेला स्वच्छतेचा देशांतील पहिला क्रमांक मिळाला. सातारा जिल्हा परिषेदेचा गौरव देशांचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे हस्ते करणेत आला. सन २०१९ व २०२०-२१ मध्ये पंडित दिनदयाळ उपाध्याय सशक्तीकरण अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. माण व खटाव या दुष्काळी भागात जानावरांचे छावणी व दुष्काळ निवारणाचे काम केले आहे. 

काम करणेची सकारात्मक पध्दतीमुळे प्रशासकीय कामात गतीमानता आणण्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांची ख्याती आहे. काटेकोरपणा, वेळेचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी यामुळे श्री धोत्रे यांनी प्रभावीपणे काम केले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

“ग्रामपंचायत”चा कारभार पारदर्शक राहील ; पंढरपूरच्या कामाचा अनुभव मार्गदर्शक : इशाधीन शेळकंदे

Next Post

सुशीलकुमार शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त कोविड योद्धयांचा सत्कार ; हे मान्यवर राहणार उपस्थित

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सुशीलकुमार शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त कोविड योद्धयांचा सत्कार ; हे मान्यवर राहणार उपस्थित

ताज्या बातम्या

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

10 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026

क्राईम

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

by प्रशांत कटारे
10 July 2026
0

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्....... सातारा जिल्ह्यातून सोलापूरला परीक्षेसाठी आलेली एक विवाहित महिला तिच्या मैत्रिणीच्या...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986959
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group