Tuesday, May 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बापू,तुम्ही महाविकास आघाडी तोडली,कशी तोडली सर्वानाच राष्ट्रवादीत जायचंय,महापौर म्हणाल्या बाई, एक वार्ड नको दोनच बरे ; पहा मजेदार किस्से उजनी भेटीचे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 August 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी समांतर जलवाहिनीचे काम सुरू आहे, त्या जलवाहिनीच्या जॅकवेलचे बंद पडलेले काम पाहण्यासाठी शनिवारी उजनी भेट दौऱ्याचे नियोजन ठरले, सभागृह नेते शिवानंद अण्णांनी दांडी मारली. मात्र महापौर श्रीकांचना यंनम, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, विरोधी पक्षनेते अमोल बापू, गटनेते रियाज खरादी, गटनेते चेतन नरोटे, गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते किसन जाधव, नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेवक नागेश भोगडे, पाणी पुरवठा अधिकारी संजय धनशेट्टी, मिस्टर महापौर रमेश यंनम यांची उपस्थिती होती. जॅकवेल ठिकाणी आल्यानंतर पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये अनेक मजेदार किस्से घडले, 

महापौरांसोबत पुढे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे व रियाज खरादी आले, नंतर सर्व जण गटनेते नरोटे, चंदनशिवे, जाधव यांची वाट पाहत होते, तेवढ्यात केवळ चंदनशिवे व नरोटे हे येताना दिसले, किसन जाधव नव्हते तेवढ्यात मिस्टर महापौर यांनी बापू तुम्ही महाविकास आघाडी तोडली म्हणून डिवचले, शेजारी थांबलेले एमआयएमचे खरादी यांनी मात्र कुठे तोडली या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच जायचे आहे की असे बोलून खरे काय ते सांगितले.

समोर उभारलेल्या अमोल बापू व नागेश भोगडे यांच्यात भगव्या झेंड्या वरून चेष्टा मस्करी सुरू झाली, बापू म्हणाले आमचा ओरिजिनल भगवा आहे तुमच्या भगव्याला हिरवं(एमआयएम) देठ आहे, बरोबर की नाही खरादी. लगेच खरादी बरोबर आहे मी तर भाजप सोबत होतो असे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

त्यानंतर महापौर श्रीकांचना यंनम व रियाज खरादी हे चालता चालता वार्ड रचनेवर चर्चा करत होते, एक वार्ड करा म्हणून नोटिफिकेशन आले आहे, पण बातम्या तर दोन सदस्य वार्ड म्हणून येत आहेत, एक वार्डची अडचण येईल दोनचा वार्ड बरा आहे बाई, असे महापौर म्हणाल्या, तेव्हा खरादी यांनी दोनच बरे कुठून तरी संधी मिळेल नाहीतर एक झाल्यास वार्ड हातातून जाईल अशी चर्चा या दोघात रंगली.

आनंद दादा सध्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार असल्याने अलर्ट आहेत, कायम आजूबाजूला पाहून ते प्रत्येक पावलं सांभाळून उचलत आहेत, उजनी पाहणी वेळी त्यांच्या नजरेस दोन अनोळखी आणि साध्या कपड्यातील युवक पडले, कोण आहेत बघा ते आपल्यातील दिसत नाहीत, आपली शूटिंग घेत आहेत विचारा म्हणून सांगितले

असे म्हणताच त्या दोन मुलांचे फोन चेक केले असता त्यांच्याकडे चर्चेचे शूटिंग मिळाले, त्यांना विचारले असता जॅकवेलचे काम घेतलेल्या मक्तेदारकडे कामाला असल्याचे सांगितले तेव्हा त्यांच्या मोबाईल मधील सर्व चित्रण delete करण्यात आले.

जेवताना नरोटे-चंदनशिवे हे शेजारी बसले होते तेव्हा समोर बसलेल्या किसन जाधव यांनी दादा तुमचे भाऊंशी चांगलंच जुळलंय म्हणताच चेतन भाऊंनी आता दादा आमच्या सोबत आहेत की, म्हणजे राष्ट्रवादीत. यावर दादांनी माझं ठरलं राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जायचं, किसन भाऊ आता तुम्ही आमचे नेते, महेश अण्णा, मी, तौफिक शेख यांचे गटनेते तुम्हीच, बघा तुमचं किती डिमांड वाढेल.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग ! सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदेंच्या बॅनरवर फेकली काळी शाई

Next Post

सुभाष देशमुखांचा आरोप ; पराभवाच्या भीतीने सरकारने सोलापूर “डीसीसी” निवडणूक पुढे ढकलली

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सुभाष देशमुखांचा आरोप ; पराभवाच्या भीतीने सरकारने सोलापूर "डीसीसी" निवडणूक पुढे ढकलली

ताज्या बातम्या

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980734
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group