Thursday, September 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

कार्तिक वारी : पंढरपूर शहरातील वाहतूकीचे आदेश ; अशी असेल 15 नोव्हेंबर पर्यंत वाहतूक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 November 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि.09  :- उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग यांनी  दिनांक 09 नोव्हेंबर 2021 अन्वये श्री क्षेत्र पंढरपूर येथे कार्तिक शुध्द पंचमी  दि. 09 नोव्हेंबर 2021 ते कार्तिक शुध्द पौर्णिमा 19 नोव्हेंबर 2021 या कालावधीत कार्तिकी यात्रा भरणार आहे. या कार्तिक वारीचा मुख्य दिवस हा दि. 15 नोव्हेंबर 2021 रोजी आहे. यात्रा कालावधीत पंढरपूर व पंढरपूर परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये म्हणून शहरातील महत्वाचे रस्त्यावर एकेरी वाहतूक व प्रवेश बंद करण्याची अनुषंगाने खालीलप्रमाणे आदेश देत आहे, असे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी कळविले आहे.

■पंढरपूर शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांबाबत

नगर ,बार्शी, सोलापूर,मोहोळ कडून येणारी वाहने करकंब क्रॉस रोड, (आहिल्यादेवी चौक) तीन रस्ता मार्गे विसावा येथे पार्किंग करतील, तसेच 65 एकर येथे फक्त दिंडी व पालखीचे वाहने पार्किंग करतील. पुणे, सातारा,वाखरी मार्गे येणारी वाहने इसबावी विसावा, गाताडे प्लॉट पार्किंग करतील. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्किंग करतील. कोल्हापूर, सांगली, मिरज सांगोला मार्गे येणारी वाहने ही कासेगांव फाटा, टाकळी बायपास मार्गे वेअर हाऊस येथे पार्किग करतील. किंवा टाकळी मार्गे येवून टाकळी हायस्कूल मैदान येथे पार्किंग करतील.

■शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहतूकीबाबत

टेंभूर्णी, नगर, सोलापूर, लातूरकडे जाणाऱ्या सर्व गाड्या सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड करकंब चौक मार्गे जातील. पुणे, साताराकडे जाणाऱ्या सर्व गाड्या सरगम चौक, कॉलेज क्रॉस रोड, वाखरी मार्गे इच्छित स्थळी जातील. विजापूर ,कराड, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, मिरज,मंगळवेढा मार्गे जाणाऱ्या सर्व गाड्या सावरकर चौक, नविन कराड नाका टाकळी बायपास मार्गाने इच्छित स्थळी जातील.

■पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहतूकीबाबत

दिनांक 10 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2021 पर्यंत संपुर्ण प्रदक्षिणा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंद करण्यात येत आहे. महाव्दार चौक ते शिवाजी चौक हा मार्ग सर्व प्रकारचे वाहनांसाठी व वाहतूकीसाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे. सावरकर चौक ते शिवाजी चौक या मार्गावर वाहतूकीसाठी सर्व प्रकारचे वाहनांसाठी बंद करण्यात येत आहे. बार्शी सोलापूर या मार्गावरून तीन रस्ता येणारी हलकी वाहने फक्त अंबाबाई पटांगणात उतरतील. नियमित ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या एस टी बसेस यांना नविन पूल, जुना दगडी पूल ते तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात येत आहे. मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक या मार्गाने शहरात सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंद करण्यात येत आहे. अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक, अंबाबाई पटांगण ते आर्बन बँक , सावरकर चौक ते आर्बन बँक, लहूजी वस्ताद चौक ते काळा मारूती चौक या मार्गावर सर्व प्रकारचे वाहनास प्रवेश बंद करण्यात येत आहे.

■ पार्किंग व्यवस्था

अहमदनगर , बार्शी, सोलापूर, मोहोळ कडून येणारी वाहने करकंब क्रॉस रोड ( अहिल्या चौक) तीन रस्ता मार्गे विसावा येथे पार्किंग करतील. तसेच नगरपालिकेच्या वाहनतळावर पार्किंग करतील. पुणे, सातारा, वाखरी मार्गे येणारी वाहने इसबावी इसावा येथे पार्किंग करतील. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने ही वेअर हाऊस येथे पार्किंग करता जातील. कोल्हापूर , सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने ही कासेगाव फाटा, टाकळी मार्गे वेअर हाऊस किंवा टाकळी मार्गे टाकळी हायस्कूल येथील मैदानात पार्किंग करीता जातील. विजापूर मंगळवेढा कडून येणारी वाहने ही कासेगाव फाटा टाकळी मार्गे येवून वेअर हाऊस मध्ये पार्किंग करतील. यात्रेच्या कालावधीत पंढरपूर शहरात येणारी हलकी वाहने अंबाबाई पटांगण येथे व संबंधित मठामध्ये पार्क होतील. व इतर वाहने ही जुन्या कराड नाक्या समोरील रेल्वे मैदान येथे पार्क करतील. शहरातील अंतर्गत रोडवर कोणत्याही ठिकाणी गाड्या पार्क होणार नाहीत.

■शहराबाहेरून जाणाऱ्या वाहतूकीबाबत

सोलापूर, बार्शी , नगरबाजूकडून नियमितपणे येवून पंढरपूर मार्गे बाह्यवळण मार्गावरून वेळापूर , अकलूज, महूद, सांगोला, मंगळवेढा बाजूकडे जाणारी जड व अवजड वाहने त्यामध्ये ट्रक , डंपर, ट्रॉलीसह ट्रेलर, कंटेनर, टँकर व गॅस टँकर सार्वजनिक वितरण व्यवस्था (शासकीय अन्नधान्य वाहतूकीची वाहने) , केरोसीन, डिझेल, पेट्रोल व गॅस सिलेंडरची वाहतूक करणारी वाहने ट्रॅक्टर ट्रॉलीसह व उस वाहतूक करणारी वाहने वगळून या वाहनांना मोहोळ शिवाजी चौक, शेटफळ फाटा, वेणेगाव फाटा, अहिल्या चौक पंढरपूर येथून पंढरपूर मार्गे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे.

■ पर्यायी मार्ग

मोहोळ, कामती , मंगळवेढा, सांगोलामार्गे इच्छित स्थळी किंवा मोहोळ , शेटफळ, टेंभूर्णी, वेळापूर, साळमुक फाटा, महूद सांगोलामार्गे इच्छित स्थळी. विजापूर, कोल्हापूर, सांगली, सातार,आटपाडी, पुणेबाजू कडून नियमित पणे येवून पंढरपूर मार्गे बाह्यवळण मार्गावरून टेंभूर्णी , शेटफळ, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला बाजूकडे जाणारी जड अवजड वाहने त्यामध्ये ट्रक, डंपर, ट्रॉलीसह ट्रेलर व ऊस वाहतूक करणारी वाहने वगळून या वाहनांना मोहोळ कुरूल फाटा , मंगळवेढा नाका, सांगोला नाका, महूद फाटा, साळमुख फाटा, श्री ज्ञानेश्वर चौक वेळापूर येथून पंढरपूर मार्गे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे.

■ पर्यायी मार्ग

कामती , मंगळवेढा, सांगोला, महूद, वेळापूर, अकलूज, टेंभूर्णी मार्गे इच्छित स्थळी किंवा महूद, सांगोला, मंगळवेढा, कामती, मोहोळमार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच दि.10 नोव्हेंबर 2021 ते 19 नोव्हेंबर 2021 या कालावधीत कार्तिक वारी संपन्न होत असल्याने जड वाहतूकीच्या आदेशास कार्तिकवारी कालावधी पुरती तात्पुरती स्थगिती देण्यास येत असून पंढरपूर शहरातून जाणारी जड वाहतूक ही वरील जाहीरनाम्यातील नमूद ठिकाणावरून बंद करण्यात येत असून ही जड वाहतूक सुचविण्यात आलेल्या पर्यायी मार्गाने जातील. आणि कार्तिक वारीचा कालावधी संपताच 7/4/2021 रोजी देण्यात आलेला आदेश 24 तासाकरीता कायमपणे पूर्वीप्रमाणे अमलात राहील. तरी सदरचा आदेश दिनांक 10 नोव्हेंबर 2021 रोजी 12 वा. 01 मिनिट ते 19 नोव्हेंबर 2021 रोजी 24.00 वाजेपर्यंत अमलात राहील, असे आदेशात नमूद केलेले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांचे बनावट नोटांचे रॅकेट होते ; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

Next Post

सोलापूर ! पंधरा हजाराची लाच मागणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासन अधिकाऱ्याला अटक ; अँटी करप्शनची बुधवारी कारवाई

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर ! पंधरा हजाराची लाच मागणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासन अधिकाऱ्याला अटक ; अँटी करप्शनची बुधवारी कारवाई

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000893
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group